सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात शुक्रवारी (दि. ३१) एकता दौडीचे आयोजन केले आहे.
जिल्हा क्रीडासंकुल ते टाऊन हॉलपर्यंत राष्ट्रीय एकता दौड निघणार आहे. सकाळी पावणेआठ वाजता क्रीडासंकुलावर एकत्र जमून ८ वाजता राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली जाईल. यानंतर एकता दौड सुरू होईल. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. दौड टाऊन हॉल मदानावर ८.३० वाजता विसर्जित होईल. तेथे हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. सरदार पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीला या वेळी अभिवादन करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या वतीने सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी अधीक्षक कार्यालयापासून विशेष परेड होईल. नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात परेडची सांगता होईल. पोलीस बँड पथकाच्या वतीने शहरातील प्रमुख पाच चौकांत राष्ट्रीय एकात्मतेची धून वाजवण्यात येईल. नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आर. डी. महादवाड व जिल्हाधिकारी पोले यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा