सिंधुदुर्गच्या साधनसामुग्रीच्या माध्यमातून सहकार संस्थांना संजीवनी देत विकास साधण्यासाठी सर्वाची एकजूट गरजेची आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायमच आघाडीवर राहील, असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिले. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवत विकास संस्था मतदानाला नावापुरत्या नको म्हणून दूध डेअरीसह विविध प्रकल्पांना साकार करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन करत यापुढे जिल्हा बँक डेव्हलपमेंट बँक म्हणून काम करेल असे ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार संस्था पदाधिकारी व ग्राहकांचा मेळावा डी. के. टुरीझममध्ये आयोजित केला होता, त्यावेळी राजन तेली बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी. बी. वारंग, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेतकरी संघटना अध्यक्ष वसंत केसरकर, संचालक विकास सावंत, गजानन गावडे, कॅथॉलीक अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस, अर्बन उपाध्यक्ष रमेश पई, सहकार मंडळ अध्यक्ष गजानन सावंत, अॅड. दिलीप नार्वेकर, उपसरपंच अस्मीता मेस्त्री, सभापती प्रियांका गावडे, बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँक इन्स्पेक्टर वरक आदी उपस्थित होते.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलून काम केले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत असून, चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्सानपर योजना लागू करण्यात येणार आहेत, असे राजन तेली यांनी सांगून महाराष्ट्र देशात सहकार तत्त्वावर सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या परदेशी बँकांना तोंड देण्यास आपण सज्ज राहिले पाहिजे असे बँक अध्यक्ष राजन तेली म्हणाले.
जिल्हा बँकेच्या ८८४ कोटींच्या ठेवी आहेत. त्या मार्चपर्यंत एक हजार कोटीपर्यंत नेताना सहकारी संस्थांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा बँक शाखा व विकास संस्था ऑनलाइन करण्यात येणार आहेत. गावागावांतील सहकार संस्थांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून जिल्ह्य़ाच्या साधनसामुग्रीसह आधारित रोजगारासाठी सज्ज होण्यासाठी एकजुटता दाखविण्याचे आवाहन करून दूध डेअरीचा संकल्प सोडण्यात येत आहे, असे सांगत शासकीय दूध डेरीचे विलीनीकरण वारणा प्रकल्पाशी केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था बदलू शकते, तो एक प्रयत्न केला जाईल असे राजन तेली म्हणाले. शाळकरी मुलांना लॅपटॉक व मुलींना सायकली देण्यासाठी कमी व्याज दराची पॉलिसी करून मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे राजन तेली यांनी सांगून डंपर व्यवसायासाठी कर्ज दिल्याबद्दल होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, डंपरसाठी कर्ज देऊन अनेकांना रोजगारासाठी उभे केले. त्यांची परतफेड चांगली असून सध्या अडचणी आहेत त्यावर तोडगा काढला जाईल असे तेली म्हणाले.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी विकास सावंत, रमेश बोंद्रे, डी. के. सावंत, गजानन गावडे, पी. एफ. डॉन्टस, अभिमन्यू लोंढे, डी. बी. वारंग, अण्णा केसरकर आदींनी विचार मांडले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी स्वागत तर बँक इन्स्पेक्टर वरक यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डी. व्ही. वारंग यांनी आभार मानले. यावेळी सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
विकास साधण्यासाठी एकजूट गरजेची – आ. राजन तेली
सिंधुदुर्गच्या साधनसामुग्रीच्या माध्यमातून सहकार संस्थांना संजीवनी देत विकास साधण्यासाठी सर्वाची एकजूट गरजेची आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायमच आघाडीवर राहील, असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिले. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवत विकास संस्था मतदानाला
First published on: 23-02-2013 at 05:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unity required for development rajan teli