‘अप्रकाशित पु.ल.’च्या प्रकाशन कार्यक्रमाला काव्यवाचनाच्या मैफिलीने रंगत; रसिकांचा उदंड प्रतिसाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुरंगी आणि बहुढंगी कलाकार, लेखक पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या आठवणींना मिळालेला उजाळा.. अभिनेता सचिन खेडेकर यांनी सादर केलेले काव्यवाचन.. दर्दी पुणेकरांनी भरभरून दिलेली दाद.. अशा वातावरणात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘अप्रकाशित पु. ल. ’ या विशेषांकाचे प्रकाशन आणि काव्यवाचनाचा सोहळा रंगला.

पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’तर्फे त्यांच्या अप्रकाशित साहित्याचा समावेश असलेल्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन पुलंचे मानसपुत्र डॉ. दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, आयुकाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी निरंजन अभ्यंकर, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सहायक संपादक मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत झाले.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे पुलंना का म्हटले जाते, याचा प्रत्यय या विशेषांक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून रसिकांना आला. पुलंच्या निधनानंतर आजही पुलं मराठी साहित्यप्रेमींमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. जुन्या पिढीइतकेच नव्या पिढीच्या वाचकांमध्ये पुलंच्या साहित्याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे तरुण वाचकही प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर आधारित पुलंनी लिहिलेल्या संहितेचे सचिन खेडेकर यांनी केलेले अभिवाचन उपस्थितांची दाद मिळवणारे ठरले. त्यातून आजच्या काळातही साहित्यप्रेमींचे कवितांवर असलेले प्रेम दिसून आले. सचिन खेडेकर यांनी वाचिक अभिनयाद्वारे कवितांमधील विविध पदर, त्यातील नाटय़ विलक्षण ताकदीने उभे केले. त्यामुळेच या अभिवाचनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

उपस्थित मान्यवरांचे मनोगत

अभिवाचन खासच

‘लोकसत्ता’ने अप्रकाशित पु. ल. या विशेषांकाची घोषणा केल्यावर कुतूहल निर्माण झाले. कारण, आता पुलंचे अप्रकाशित असे काय साहित्य आहे, याची उत्सुकता निर्माण झाली. हे अप्रकाशित साहित्य वाचण्याचा आनंद ‘लोकसत्ता’ने मिळवून दिला, त्यासाठी ‘लोकसत्ता’चे आभार मानावेसे वाटतात. पुलंनी लिहिलेल्या संहितेचे अभिवाचन हे प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय़. सचिन खेडेकर यांचा आवाज फारच अप्रतिम आहे. त्यांच्या आवाजाने पुलंच्या संहितेतील शब्दांना वजन मिळाले. पुलंनी जे अभिवाचनाचे कार्यक्रम केले, त्यात एकप्रकारे ममत्व होते. सचिन खेडेकर यांची शैली त्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षक, आस्वादक म्हणून एक नवा अनुभव मिळाला. – राजीव तांबे, बालसाहित्यकार

हृद्य संवाद वाचण्याचा आनंद

पुलंनी त्या काळात जो संवाद साधला, तो अप्रकाशित राहिला. हा संवाद सुहृदांशी, मित्रांशी झालेला होता. या विशेषांकातून हा संवाद वाचायला मिळेल ही विशेष आनंदाची गोष्ट ठरेल. सचिन खेडेकर हे उत्तम अभिनेता, अभिवाचक आहेतच.. मात्र, केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर आधारित पुलंनी लिहिलेल्या संहितेचा कार्यक्रम ऐकायला मिळाला नव्हता. मात्र, ती उणीव या कार्यक्रमातून पूर्ण झाली.         – सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक

उत्तम कार्यक्रम

‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अत्यंत उत्तम प्रकारे झाला. ‘लोकसत्ता’च्या लौकिकाला साजेसा झाला. पुलंचे साहित्य पुस्तकातून आले आहे. मात्र, या विशेषांकातील अप्रकाशित लेख, भाषणे वाचणे नक्कीच आनंददायी ठरेल. १९६५ मध्ये पुलंनी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसमोर असा काही अभिवाचनाचा कार्यक्रम केला असेल, त्याचा कसा प्रतिसाद मिळाला असेल हे आताच्या वातावरणातून डोळ्यासमोरही येत नाही. सचिन खेडेकर यांनी फारच उत्तम पद्धतीने काव्यवाचन सादर केले.    – चंद्रकांत काळे, ज्येष्ठ गायक-अभिनेते

‘लोकसत्ता’ने महत्त्वाचा दस्तावेज दिला

देखणा, सुटसुटीत, आटोपशीर आणि दर्जेदार कार्यक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन. सचिन खेडेकर यांनी पु. शि. रेगे, केशवसुत यांच्या कवितांचे केलेले वाचन हा कळस होता. या निमित्ताने माहिती नसणारे पुलं आम्हाला कळाले. कशा प्रकारचे संबंध पूर्वीच्या काळी लेखक, कलाकारांसह दिग्गजांमध्ये होते. आपल्या समकालीन लेखक, कलाकारांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती होती. या सर्वाचे दर्शन काव्यवाचनातून झाले. या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिला. – वीरेंद्र चित्राव, सचिव, आशय सांस्कृतिक

पुलंच्या काळात घेऊन जाणारा समारंभ

कविता वाचनाच्या कार्यक्रमाला बेताचाच प्रेक्षकवर्ग लाभतो. परंतु, ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी नाटय़गृह खचाखच भरलेले होते. कार्यक्रम सुरेख झाला. पु. ल. देशपांडे यांच्यावरील प्रेमाने आलेला हा वर्ग होता. कविता सादर होताना उपस्थितांकडून प्रतिसादही मिळत होता. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम आनंददायी होता आणि सदैव लक्षात राहील, असा होता. एकूणच पुलंच्या काळात घेऊन जाणारा हा समारंभ होता.   – शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

जुन्या काळाची आठवण झाली

जन्मशताब्दी वर्षांत पुलंचे अप्रकाशित साहित्य वाचकांपुढे आणण्याची कल्पनाच फार उत्तम आहे. ‘लोकसत्ता’सारख्या वृत्तपत्राने पुढाकार घेऊन हे साहित्य प्रकाशित करणे ही विशेष आनंदाची बाब. पुलंचे हे अप्रकाशित साहित्य वाचकांना नक्कीच आनंद देईल. अभिवाचनाच्या कार्यक्रमामुळे जुन्या काळाची आठवण झाली. पुलं आणि सुनीताबाईंनी केलेल्या कार्यक्रमांच्या आठवणी मनात साठवल्या आहेत. सचिन खेडेकर यांनी अप्रतिम वाचनाने त्या कार्यक्रमांच्या काळात नेले. इतक्या उत्तम कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो.   – उल्हास पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

कवितांचे उत्तम रसग्रहण

पुलंचे पुष्कळ साहित्य आतापर्यंत वाचले आहे. तसेच सुनीताबाईंचे कवितावाचनाचे कार्यक्रम अनुभवण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांची एक स्मृती माझ्या मनात कायम आहे. दोन वेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या कवितांचे रसग्रहण खेडेकरांनी उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. अशा प्रकारचा कार्यक्रम ‘लोकसत्ता’ने केला, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. कार्यक्रमाची कल्पना छान होती.    – शमा भाटे, ज्येष्ठ कथक गुरू

मनाला भावणारा कार्यक्रम

दिनेश ठाकूर यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्याबद्दलचे १९५७ पासून पुलंनी केलेले काम प्रकाशात आणले आणि त्यासाठी ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेतला, हा सुंदर योग जुळून आला. ‘अप्रकाशित पु. ल.’ हा अंक म्हणजे लोकाभिमुख आणि कायम लक्षात राहण्यासारखे काम आहे. ‘लोकमान्य लोकशक्ती’ हे केवळ घोषवाक्य म्हणून न ठेवता ते प्रत्यक्षात आणणारे वृत्तपत्र म्हणून ‘लोकसत्ता’चा लौकिक आहे. त्यामुळे वर्षभर पुण्यासह महाराष्ट्रात असे कार्यक्रम घ्यायला हवेत. खेडेकरांनी सादरीकरणात कवितांच्या अभिवाचनाची खुबी दाखवून दिली. हा कार्यक्रम मनाला भावला.    – डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन

सादरीकरणाला दाद द्यायला हवी

पु. ल. देशपांडे ही काय चीज होती, त्यांची निवड काय होती हे अनाकलनीय आहे. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांचा साधलेला संयोग आणि सचिन खेडेकर यांनी केलेल्या सादरीकरणाला खरोखरच दाद द्यायला हवी. पुन्हा त्या काळात गेल्यासारखे वाटले.  – श्रीराम रानडे, ज्येष्ठ रंगकर्मी

तोच आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला

पु.ल. आणि सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा कार्यक्रम झाला. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्या कवितांनी माझ्या पिढीला खूप आनंद दिला आहे. तोच आनंद पुन्हा अनुभवायला मिळाला. पुलंची गुणग्राहकता, कवितांमधील नाटय़मयता खेडेकरांनी उत्तमरीत्या मांडली. अभिवाचनासाठी सचिनने केलेला अभ्यास सादरीकरणातून दिसत होता. चांगला, दर्जेदार कार्यक्रम घेतल्याबद्दल ‘लोकसत्ता’च्या संपूर्ण टीमचे आभार.    – सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ भरतनाटय़म् गुरू

संपूच नये, असे वाटत असताना कार्यक्रम संपला

अभिनेता सचिन खेडेकर यांनी कवितांचा मथितार्थ डोळ्यासमोर उभा राहील अशा पद्धतीने कवितांचे वाचन केले. कविता आणि कार्यक्रमाची उंची एवढी होती, की हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत असतानाच संपला.     – चंद्रकांत दळवी, माजी सनदी अधिकारी

काव्य अभिवाचन सुरेख

आटोपशीर कार्यक्रम लवकर संपल्याची हुरहुर जरूर आहे. पण, संपू नये असे वाटत असताना संपलेल्या कार्यक्रमाने भरपूर आनंद दिला. ‘अप्रकाशित पु. ल.’ आमच्यासाठी खुले केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे मनापासून धन्यवाद. शब्दांवरचे आघात आणि स्वर केव्हा बदलायचा यावर हुकमत असलेल्या सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाने भारावून गेलो. असे सुस्पष्ट वाचन करणे अवघड असते.     – डॉ. श्रीकांत बहुलकर, मानद सचिव, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

‘अप्रकाशित पु. ल.’ ही कायमस्वरूपी ठेव

पुलंच्या साहित्याबद्दल अनेकांच्या मनात आजही उत्सुकता आहे. पुलंचे अप्रकाशित साहित्य वाचायला मिळणार हीच सुंदर कल्पना आहे. मी स्वत: माझ्या मित्रमंडळींना देण्यासाठी अंक विकत घेतले. या अंकाच्या निमित्ताने पुलंच्या साहित्याचा एक ठेवा साहित्यप्रेमींना कायमस्वरूपी उपलब्ध झाला. पु. शि. रेगे आणि केशवसुत यांच्या कवितांचे वाचन खेडेकरांनी जीव ओतून केले.   – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

अफलातून ठेवा ‘लोकसत्ता’ने सुपूर्द केल्याचा आनंद

‘अप्रकाशित पु. ल.’ विशेषांकाच्या माध्यमातून अफलातून ठेवा ‘लोकसत्ता’ने आमच्या हाती सुपूर्द केला आहे. कार्यक्रम तर सुरेखच झाला आणि सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाने त्यावर कळस चढविला. दोन तासांच्या कार्यक्रमानंतर केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कविता गुणगुणतच मी घरी गेले. या कार्यक्रमाने माझ्या महाविद्यालयीन दशेतील सुखद स्मृती जाग्या केल्या.    – डॉ. सरोजा भाटे, विश्वस्त, प्राज्ञ पाठशाळा

कवितांची निवड उत्तम

नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे ‘अप्रकाशित पु. ल.’ हा मौल्यवान विशेषांक दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. सचिन खेडेकर यांच्या काव्य अभिवाचनाची मैफील सुरेख झाली. केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांची निवड चांगली होती. मुख्य म्हणजे आवाजाचा पोत, शब्दांवरचे आघात हे ध्यानात घेता सचिन खेडेकर यांनी या कवितांच्या वाचनासाठी मेहनत घेतली असल्याचे जाणवले.   – निर्मला गोगटे, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री

विशेषांकाविषयी उत्सुकता

वाचक म्हणून ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकात काय असेल, याची उत्सुकता मला होती. कारण पुलंचे बहुतेक साहित्य पुस्तकांतून वाचकांसमोर आले आहे. मात्र ‘लोकसत्ता’ने हा विशेषांक प्रकाशित करून मोठे काम केले आहे. सचिन खेडेकर यांचे अभिवाचन कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहील. पुलंचे शब्द आणि सचिन खेडेकर याचे अभिवाचन हा उत्तम योग ‘लोकसत्ता’ने जुळवून आणला, विशेषांकाच्या निमित्ताने पुलंचे मानसपुत्र डॉ. दिनेश आणि ज्योती ठाकूर यांचा सन्मान ‘लोकसत्ता’ने केला, ही महत्त्वाची गोष्ट आहे.     – गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक

‘अप्रकाशित पु.ल.’ येथे मिळेल   – ग्रंथविक्रेत्याचे नाव- संपर्क क्रमांक- शहर

  • क्रांती बुक स्टॉल, एचडीएफसी बॅंकेजवळ- ९८९०३३२६६६- बीड
  • लाखेरा एनपीएस एसटी बुक स्टॉल- ९८२२६६१३८१- अंबेजोगाई
  • एसटी शहा-८१४९३१११२१-जालना
  • कॉर्नर एनपीए-८२०८६००६२३-उस्मानाबाद
  • अभंग बुक स्टॉल, आयटीआय चौक-९८२३४७०७५६-नांदेड
  • योगी बुक स्टॉल- ९४२३४३७९५७-नांदेड
  • अक्षरा बुक गॅलरी-७५८८०८१८८७-परभणी
  • ए. एच. व्हीलर, रेल्वे स्टेशन- ९४२०९६५०४२-परभणी
  • अपुर्वा बुक स्टॉल, बस स्टॅन्डजवळ- ९८५०५६७०३९-हिंगोली
  • दी युनियन एसटी बुक स्टॉल-९४२११८६१४०-चाळीसगाव
  • पाठक ब्रदर्स-९४२२७७१८२०-जळगाव
  • सत्यम बुकस्- ९४२००७२९६७-जळगाव
  • प्रशांत बुक हाऊस-२५७२२२७२३१-जळगाव
  • मनोज पुस्तकालय-९४२३४९५८९२- धुळे</li>
  • सर्कल न्युज पेपर- ९३७३२३१७७९- धुळे
  • गुरू बुक स्टॉल, सिडको- औरंगाबाद</li>
  • गजानन बुक स्टॉल, गारखेड- औरंगाबाद
  • धामणे बुक स्टॉल, नुतन कॉलनी- औरंगाबाद
  • सनराईज बुक स्टॉल, रेल्वे स्टेशन- औरंगाबाद
  • गजानन बुक स्टॉल, सुतगिरणी चौक- लातूर
  • विवेक बुक स्टॉल, हनुमान चौक- लातूर
  • कराड बुक स्टॉल, सिग्नल कॅम्प- लातूर
  • केशव बुक स्टॉल, शिवाजी चौक- लातूर
  • विजय बुक स्टॉल- बर्डी, नागपूर</li>
  • फ्रेंडस् बुक स्टॉल- छावणी, नागपूर
  • विजय बुक स्टॉल- इंदोरा, नागपूर
  • मॅगझिन स्टेशनर्स- रामदासपेठ, नागपूर
  • पाठक ब्रदर्स-रामदासपेठ, नागपूर
  • मनिष बुक स्टॉल- मेडिकल स्वेअर, नागपूर
  • नाथे बुक डेपो-मेडिकल स्वेअर, नागपूर
  • पटेल बुक स्टॉल- धंतोली, नागपूर
  • सतीश बुक स्टॉल- प्रतापनगर, नागपूर
  • धांडे बुक स्टॉल-रामनगर, नागपूर
  • संदेश एजन्सी- आप्पा बळवंत चौक, पुणे
  • रसिका साहित्य-आप्पा बळवंत चौक, पुणे
  • उत्कर्ष बुक डेपो- डेक्कन, पुणे
  • अक्षरधारा बुक डेपो-बाजीराव रोड, पुणे
  • जवाहर बुक डेपो-पार्ले पूर्व, मुंबई
  • मॅजेस्टिक बुक डेपो- पार्ले पूर्व, मुंबई
  • मॅजेस्टिक बुक हाऊस, भगतसिंग रोड- डोंबिवली, पूर्व, मुंबई
  • गद्रे बंधू, फडके रोड-डोंबिवली, पूर्व, मुंबई
  • बागवे बुक स्टोअर्स- गिरगाव, मुंबई
  • तुकाराम बुक स्टोअर्स- सीपी टॅंक, मुंबई
  • मनिष बुक स्टॉल- शिवाजी मंदिर, मुंबई
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unpublished p l deshpande literature by loksatta
Show comments