वाई : साताऱ्यासह महाबळेश्वर पाचगणी, वाई, खंडाळ्याला विजांच्या कडकडात ढगांच्या गडगडाटात मुसळधार अवकाळी पावसाने
झोडपले. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. महाबळेश्वर पाचगणीत अचानक आलेल्या पावसाने पर्यटक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची त्रेधा उडाली.
आज दुपारनंतर सायंकाळ पर्यंत सातारा शहर,सातारा तालुका,महाबळेश्वर पाचगणी वाई खंडाळा, शिरवळ,मांढरदेव,भुईंज परिसरात विजांच्या कडकडात ढगांच्या गडगडाटात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने महाबळेश्वर पाचगणीत पर्यटकांची आडोसा हुडकण्यासाठी एकच धावपळ उडाली.मांढरदेव येथे भावीकानाहीं आडोसा हुडकवा लागला. काही भागात जोरदार वादळी वारे वाहिले.यामुळे झाडे पडली,वीज वितरणच्या तारा तुटल्या.खांब वाकले.वादळी वारे विजांच्या कडकडाटासह काही भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्याने शेतात,रस्त्यावर आंब्यांचा सडा पडला. या पावसाने महामार्गाची गती मंदावली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
हेही वाचा…सांगली: वळीव पाऊस, कुठे दमदार, कुठे हुलकावणी
या वर्षातला हा पहिलाच मोठा बिगर मोसमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्यांनी दिलासा व्यक्त केला. शिरवळ ला (ता खंडाळा)अवकाळी पावसाने झोडपले,शिरवळचे ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेनिमित ठेवण्यात आलेल्या कुस्त्यांचा आखाडा स्थगित करावा लागला,यात्रेमधील व्यापाऱ्यांना जबरदस्त फटका तर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.