गेल्या आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे महावितरण कंपनीचे मोठे आíथक नुकसान झाले असून अनेक गावात विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची पाळी आली आहे.
लातूर विभागात १ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत उच्चदाब वाहिनीचे १८ तर लघुदाब वाहिनीचे ९७ विजेचे खांब कोसळून पडले आहेत. शहरातील एमआयडीसी ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. लातूर तालुक्यातील तांदुळजा, गाधवड व रेणापूर भागातही मोठे नुकसान झाले आहे. निलंगा विभागातील उच्चदाब वाहिनीचे ६२ तर लघुदाब वाहिनीचे ९३ खांब व ५ रोहित्र कोसळले. उदगीर विभागात उच्चदाब वाहिनीचे ४८, लघुदाब वाहिनीचे ११३ खांब व ४ रोहित्र कोसळले आहेत. यामध्ये देवर्जन ते शंभु उमरगा या ३३ केव्ही वाहिनीचे ७ खांब ११ एप्रिल रोजी पडले. १२ तारखेला महावितरणने हे सर्व खांब पुन्हा उभे केले.
वारंवार येणाऱ्या वादळी वारे व गारपिटीमुळे कोसळलेले खांब व वाहिन्या वेळेत दुरुस्त करण्यात महावितरणला मोठी कसरत करावी लागते आहे.
िहगोलीत अवकाळीमुळे महावितरणचे मोठे नुकसान;
महावितरणचे ५०० खांब वाकले
वार्ताहर, िहगोली
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकांची वाट लागली. तर महावितरणचे ५०० च्या वर खांब वाकले, पडले. काही ठिकाणी जनावरांच्या अंगवार वीज पडल्याने तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. मंगळवारी सकाळी काही भागात पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या गुरुवारपासून ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने हळद, केळी, कांदे, टरबूज, आंबे, गहू, ज्वारी यांचा समावेश आहे. तर अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली. औंढा नागनाथ तालुक्यातील जलालधाबा येथील लक्ष्मण साबळे यांच्या बलांच्या अंगावर वीज पडून दोन बल मृत्युमुखी पडल्याने १ लाखांचे नुकसान झाले, तर रविवारी रात्री बोजेगाव येथील मारोती गिरी, विश्वनाथ सांगळे, यांच्या गाय व बलावर वीज पडल्याने दोन्ही जनावरे मृत्युमुखी पडून २५ हजारांचे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे महावितरणचे सुमारे ४५० खांब वाकले, तर १०० च्या वर मोडले असून परिणामी सुमारे १० च्या वर रोहित्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात सापडली आहेत. ११ एप्रिल रोजी पडलेल्या पावसामुळे वाकलेले खांब व मोडून पडलेल्या खांबामुळे महावितरणचे २० लाखांवर नुकसान झाले आहे.