मिक्सर विकण्याचं काम करणाऱ्या परप्रांतीय तरूणाने लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा राहणारा आहे. २४ वर्षीय आरोपी महंमद हा मिक्सर विकण्याचं काम करतो.

लातूरातील शिराळा वांजरवाडा गावात ही घटना घडली आहे. मिक्सर विकण्याचे काम करणारा २४ वर्षीय आरोपी महंमद कुरेशी याने दुपारच्या वेळी घरात गतिमंद मुलगी एकटीच असल्याचं हेरत बलात्कार केला. मुलीनं आपल्याबरोबर घडलेली घटना नातेवाईकांना सांगितली. घरच्यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांनतर शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोमवार दुपारी मिक्सर विकण्यासाठी आरोपी महंमद कुरेशी शिराळा वांजरवाडा वस्तीवर आला होता. पाणी पिण्याच्या बहाण्याने त्याने घरात प्रवेश केला. घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून या नराधमाने गतिमंद मुलीवर अत्याचार केला. यानंतर नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला. हा सर्व प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितल्यानंतर, हे प्रकरण उजेडात आलं. या घटनेची माहिती फोनवरुन सर्वत्र देण्यात आली. मग मिक्सर विकणाऱ्या तरुणास पकडण्यात आलं. आरोपीला पीडित मुलीसमोर आणलं असता, मुलीने त्याला ओळखलं. त्यानंतर आरोपीला शिरुर अनंतपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू करत आरोपीला चार तासाच्या आत बेड्या ठोकल्या. गुन्हा झाल्यानंतर पीडित मुलीने तात्काळ कुटुंबियांना माहिती दिली. १२ वाजता नराधमाने आत्याचाराचे कृत्य केले. त्यानंतर मुलीने स्वत:ला सावरत दीड वाजता घटनाक्रम घरी सांगितला. कुटुंबियांनी क्षणाचा विलंब न करता पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमध्ये तात्काळ ही माहिती पसरवली. साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Story img Loader