अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण भरल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या लगत सातपूडा पर्वत रांगांवर भरपूर पाऊस झाल्याने काल शुक्रवार रात्रीपासून धरणाच्या पातळीत वाढ होत होती. तसेच जिल्ह्यातील शहापूर, पूर्णा, चंद्रभागा ही धरणेही ७० टक्के भरली गेल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेची इशारा देण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण भरल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या लगत सातपूडा पर्वत रांगांवर भरपूर पाऊस झाल्याने

First published on: 20-07-2013 at 04:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upper wardha dam three door open due to heavy rain