सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वादामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत असल्याचा आरोप करत शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, निधी वाटपात होत असलेल्या भेदभावाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपासह विरोधी पक्षांनी सर्वसाधारण सभागृहात मटके फोडून आंदोलन केले. सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. परंतु, पक्षातील अंतर्गत वादाचा परिणाम शहर विकासावर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. विरोधी नगरसेवक प्रचंड आक्रमक झाले होते. विरोधकांचा रुद्रअवतार पाहून महापौर शोभा बनशेट्टी यांनी सभा तहकूब केली. महापौरांनी विरोधकांचे ऐकून न घेतल्याने नगरसेवक प्रचंड संतापले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in