लोकसभा निवडणुकीत विनापरवाना प्रचारासाठी वापरली जाणारी २३ वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केली असल्याची माहिती हरिश्चंद्र गडिशग यांनी शुक्रवारी दिली. प्रचारासाठी १२९ वाहने राजकीय पक्षांनी प्रचारासाठी वापरण्याकरिता परवानगी मागितली असून १७ पकी केवळ ५ उमेदवारांकडूनच वाहनांची परवानगी घेण्यात आली असल्याचे गडसिंग यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारासाठी बॅनर, झेंडे यांचा वापर करून वाहने वापरण्याकरिता निवडणूक आयोगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी आवश्यक ठरविली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या निर्देशानुसार उपप्रादेशिक विभागाची तीन भरारी पथके जिल्ह्यात वाहनांची तपासणी करीत असून त्यांच्यासोबत ११ व्हिडीओ, छायाचित्रकार आहेत. काँग्रेसचे प्रतिक पाटील यांनी ४९, महायुतीचे संजय पाटील यांनी ५०, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रा. नितीन सावगावे यांनी २४, आपच्या अॅड. समिना खान यांनी ३ अशी वाहनांची नोंदणी झाली असून विनापरवाना ७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापकी २३ वाहने जप्त करून ५६ वाहनधारकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
प्रचारासाठी विनापरवाना वापर; २३ वाहने जप्त
लोकसभा निवडणुकीत विनापरवाना प्रचारासाठी वापरली जाणारी २३ वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केली असल्याची माहिती हरिश्चंद्र गडिशग यांनी शुक्रवारी दिली.
First published on: 12-04-2014 at 03:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use without a license for promotion 23 vehicles seized