बीड : अवदा कंपनीतील कर्मचाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारे वाल्मिक कराड यास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करुन मंगळवारी सायंकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुणे येथून आरोपी कराड यास ताब्यात घेऊन तपासाची पुढील प्रक्रिया केली जाईल असे पोलिसातील वरिष्ठ सूत्राने सांगितले. केज येथे खंडणी प्रकरणातील आरोपानंतर कराडे याचे नाव संतोष देशमुख प्रकरणातील हत्येचा सूत्रधार म्हणून चर्चेत आले होते. दरम्यान शरण येताना हत्येच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मारेकऱ्यास शिक्षा व्हावी अशी भूमिका असल्याचे कराड याने समाजमाध्यमांमध्ये जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘अफझल गुरू, कसाबनेही स्वतःचा गुन्हा कबूल केला नव्हता’, वाल्मिक कराडच्या शरणागतीवर सुरशे धस यांची मोठी प्रतिक्रिया

कराड याच्यावर या पूर्वी १० गुन्हे दाखल असून त्यात खंडणी मागणी, अवैध जमाव जमविणे, दंगल घडवून आणणे आदीचा समावेश आहे. राज्य गुन्हे अन्वषण विभागाने त्याच्या गुन्ह्याची यादी तयार केली असून ती न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्या आधारे त्यास पोलीस कोठडी मागण्यात येईल. दरम्यान पुण्याहून कराड यास आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडचे पाेलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सीआयडीचे प्रमुख अधिकारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. बीड शहरातून कराड यास आणले जाणार असल्याने जमाव एकत्र होऊ नये, याची काळजीही पोलीस घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपीची व कराड यांची एकत्र व वेगवेगळी चौकशी होईल असे सांगण्यात येत आहे.