Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती. अनेक ठिकाणी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदान चालू होतं असंही सांगण्यात आलं होतं. या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी संशय व्यक्त केला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे वंचितने निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचितने आपल्या पत्रात म्हटलं आहे की “नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित अतिशय गंभीर प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला (राज्य मुख्य निवडणूक आयुक्त) पत्र लिहित आहोत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील आमचा विश्वास डळमळीत आणि घसरला असल्याने आम्ही ही उत्तरे शोधत आहोत; निवडणुका प्रलोभनमुक्त आणि पारदर्शक नव्हत्या यावर विश्वास ठेवण्याची आमच्याकडे कारणे आहेत. एका मुलाखतीत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांनी तात्पुरत्या मतदारांच्या मतदानाची आकडेवारी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अंतिम डेटा यांच्यातील व्यापक तफावताबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती, आणि मतमोजणी जाहीर झालेल्या अंतिम मतदानाची टक्केवारी आश्चर्यकारकपणे ७.८३ टक्क्यांनी वाढून ६६.०५ टक्के झाली आहे”.

हे ही वाचा >> Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने निवडणूक आयोगाला विचारलं आहे की “२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता एकूण मतदारांची संख्या ५,६४,८८,०२४ असेल. रात्री ११.३० पर्यंत, मतदानाची टक्केवारी ६५.०५ टक्क्यांवरी वर गेली होती, ज्याचा एकूण आकडा ६,३०,८५,७३२ असेल. संध्याकाळी पाच ते रात्री ११.३० वाजेपर्यंत एकूण मतदान झालेल्या एकूण मतांमध्ये ६५,९७,७०८ मतांची वाढ झाली आहे. म्हणजेच जवळपास ६६ लाख मतं वाढली आहेत. मतमोजणीच्या काही तासांपूर्वी पुन्हा एकूण मतांमध्ये ९,९९,३५९ मतांची वाढ झाली, यापेक्षा आश्चर्याची गोष्ट काय असेल. २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ ते २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ७५,९७,०६७ मतांची वाढ झाली. हे ‘उशीरा’ झालेले आकडे केवळ आश्चर्यकारकच नाहीत तर निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करतात. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, प्रलोभनमुक्त आणि पारदर्शक असावी आणि म्हणूनच आमचे काही प्रश्न आहेत”.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र हे सांगतील का?

१. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ
२. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते संध्याकाळी ६ या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का. तशी नोंद झाली असल्यास त्याचा तपशील देणे
३. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५९ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का? नोंदवली असल्यास, त्याचा तपशील द्यावा.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”

आम्हाला आशा आहे की आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील कारण संपूर्ण महाराष्ट्र उत्तरांची वाट पाहत आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची प्रशंसा करतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aaghadi asks 3 questions to election commission doubts on maharashtra assembly polls results 2024 asc