आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहू लागले आहेत. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीसह सत्ताधारी भाजपाच्या ‘एनडीए’ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही विधानसभेसह लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पण महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाबद्दल अद्याप स्पष्टता आली नाही. येत्या काही दिवसांत अनेक बाबी स्पष्ट होतील.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच ठाकरे गटाशी युती केली आहे. पण ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला किती जागा मिळणार आणि त्यातून वंचित बहुजन आघाडीला किती मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
ISRO New chairman Dr V Narayanan
ISRO New Chairman : डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख, १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!

“आगामी २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू. आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे,” अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Story img Loader