राज्यात सध्या ठाकरे गट आणि वंचित बहजुन आघाडीच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची भेट झाली. या भेटीत इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकर यांना यावेळी भाजपाशी युती करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी हा शक्यता फेटाळून लावली. आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तसंच जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे असं सांगत शिंदे गटाशी युती करण्याचा दावाही फेटाळून लावला.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले “काही घटक…”

“आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरे गटाशी युती नाही – प्रकाश आंबेडकर

दरम्यान ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती”.

ठाकरे गट-वंचित युतीच्या चर्चेत CM शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांची भेट; पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री म्हणाले…

“नाना पटोलेंनी काँग्रेस एकटं लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की आमच्याशी प्रत्येकजण वेगळं बोलणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

“२० तारखेचा पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. प्रबोधनकार यांच्याशी संबंधित नवं पोर्टल आहे. प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांचे संबंध जवळचे असल्याने त्यांनी या पोर्टलच्या उद्धाटनास येण्याची विनंती केली होती. त्यासाठी मी होकार दिला असून, हजर राहणार आहे. पण महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं पुढे काय होईल असं दिसत नाही,” असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

“काँग्रेसचे काही नेते भेटून गेले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेशी राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांचे काही नेते भेटले हे खरं आहे. पण ही भेट फक्त २० तारखेच्या कार्यक्रमासंबंधी होती,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

Story img Loader