Vanchit Bahujan Aghadi : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळपास शांत झाली आहे. यंदा तीस वर्षांत पहिल्यांदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालंय. तर मतदानात्तोर चाचण्यांमध्ये महायुतीत सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांचा निकाल उद्या (२३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून जाहीर होईल. दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. महायुतीने सत्ता स्थापन केल्यास आम्ही महायुतीला पाठिंबा देऊ, अशी उघड भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. आता, प्रकाश आंबेडकर यांनीही सत्ता स्थापनेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही वाचा >> आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.”

तसंच, “आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू !”, असंही ते म्हणाले.

राजकीय खिचडी होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे नाहीत. निकालानंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे. राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहणार आहेत, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले होते.  महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी किमान १०० जागा राष्ट्रवादीचे शरद पवार गट, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाकडे जातील. उर्वरित १८८ जागांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट व इतर पक्षांचा समावेश राहील. सरकार स्थापनेसाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमता एवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना सत्तास्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अवलंबून रहावे लागेल. भाजप व काँग्रेसला बाहेर ठेऊन इतर पक्षांनी एकत्रित येत महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याचा प्रयोग देखील होऊ शकतो. त्यामध्ये जुळवाजुळव करण्यात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका महत्त्वाची असेल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

k

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi prakash ambedkar will join government with any party sgk