Prakash Ambedkar On OBC reservation : महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाष आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. ते सध्या पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर करत मोठा दावा केला आहे. ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आरक्षणवादी कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पाठिमागे उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं?

“मी सध्या आयसीयूमध्ये (ICU) आहे. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही झालेली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी देखील महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला एसीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत आपले आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, आरक्षणवादी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठिमागे उभा राहा”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi president prakash ambedkar on obc reservation and maharashtra vidhan sabha election 2024 gkt