Devendra Fadnavis Viral Video : महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा धुव्वा उडवत महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुती आता केव्हाही सत्ता स्थापन करू शकते. दरम्यान, महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाला मिळणार असल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्यात गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झालं असल्याचंही म्हटलं जातंय. त्यातच त्यांच्या टीमच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याचं अधोरेखित होत आहे.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महायुतीने बाजी मारत २३० जागांवर विजय मिळवला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर बाजी मारली. महायुतीतून सर्वात कमी जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४१ जागांवर विजय मिळवला.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा >> Devendra Fadnavis: महायुतीचं अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे, अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयाला होकार दिला आहे. भाजपामधल्या दोन उच्चपदस्थ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त असतानाच अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील त्यांचीच एक कविता आता व्हायरल होऊ लागली आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीसांचे काही फोटो असून महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर झालेल्या कारवाईंचे वृत्तही देण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांची कोणती कविता?

वापस आना पड़ता है, फ‍िर वापस आना पड़ता है, जब वक्त की चोटें हर सपने हर लेती हैं, जब राह की कीलें पग छलनी कर देती है, ऐसे में भी गगनभेद हुंकार लगाना पड़ता है, भाग्य को भी अपनी मुट्ठी अध‍िकार से लाना पड़ता है, वापस आना पड़ता है, वापस आना पड़ता है. कहां बंधी जंजीरों में हम जैसे लोगों की हस्ती, ध्वंस हुआ, विध्वंस हुआ, भवरों में कहां फंसी कश्ती, विपदा में मन के पल का हथियार चलाना पड़ता है, अपने हिस्से का सूरज भी खुद ख‍ींचकर लाना पड़ता है, प‍त्थर की बंद‍िश से भी क्या बहती नद‍ियां रुकती है, हालातों की धमकी से क्या अपनी नजरें झुकती है, किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पड़ता है, जिसमें मशाल सा जज्बा हो वो दीप जलाना पड़ता है, वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है!

सायंकाळी घोषणेची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संध्याकाळी दिल्लीत शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यासमवेत सत्तावाटपाचा तपशील आणि मंत्रिमंडळ रचना यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून त्यानंतर घोषणा अपेक्षित आहे.

Story img Loader