विठ्ठलनामाच्या गजरात संत तुकाराममहाराजांची पालखी रविवारी सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करती झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह आमदार हणमंत डोळस, जिल्हाधिकारी रणजितकुमार, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू आदींनी सराटीच्या पुलावर पालखीचे स्वागत केले. तर सदाशिवनगरजवळील पुरंदावडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न झाला.

संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आतापर्यंत सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात होत असे.  परंतु यंदा प्रथमच पालखीच्या चोपदारांनी हे ठिकाण बदलून तेथून जवळच असलेल्या पुरंदावडे येथे गोल रिंगण भरविले. त्यामुळे सदाशिवनगरवासीयांनी नाराजी व्यक्त केली खरी; परंतु पालखी विश्वस्तांचा निर्णय कायम राहिला.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

दोन वर्षांपूर्वी सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखान्याच्या समोरील सात एकर क्षेत्राच्या मैदानावर माउलींचा गोल रिंगणाप्रसंगी वाद निर्माण होऊन रिंगण रद्द झाले होते. त्यानंतर हे रिंगण सदाशिवनगरऐवजी त्यास खेटून असलेल्या पुरंदावडे गावच्या हद्दीत भरविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार यंदा हा गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. हजारो वारकरी व भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण तयार झाले आणि थोडय़ाच वेळात पालखीच्या चोपदारांनी इशारा करताच माउलींच्या अश्वाने रिंगणाभोवती गोलाकार दौड केली. त्यावेळी ‘माउली-माउली’च्या नामघोषाने परिसर दणाणून गेला. सश्रध्द भावनेने वारकरी व भाविकांनी माउलींच्या अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावून धन्यता मानली. यानिमित्ताने शंकर साखर कारखान्याच्या वतीने सुमारे ५० हजार वारकऱ्यांना मिष्ठान्न देण्यात आले.

गोल रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माउलींचा पालखी सोहळा पुढे सरकत माळशिरसच्या दिशेने निघाला. सायंकाळी पालखीचा दळभार माळशिरस येथे मुक्कामी थांबला. हजारो भाविकांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासनाच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर जिल्ह्य़ात सराटी येथे होताच पालखीचे स्वागत झाले. नंतर पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाला. नेहमीप्रमाणे गांधी चौकात पालखीचे अकलूजकरांनी जंगी स्वागत केले. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सभागृहनेते धैर्यशील मोहिते-पाटील आदींनी टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केले. पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोहोचल्यानंतर तेथे गोल रिंगणाची तयारी झाली. हा गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी अगोदरपासूनच हजारो भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. मिळेल त्या जागेवर बसून भाविकांनी रिंगण सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहिला.

३३० पालख्या घेऊन संत तुकाराम महाराजांचा हा ३३१ वा पालखी सोहळा होता. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत पालखीच्या विश्वस्तांनी इशारा करताच गोल रिंगणास प्रारंभ झाला. टाळ-मृदुंगांच्या निनादात व तुकाराममहाराजांच्या जयघोषात अश्वाने गोल रिंगण पार करताच त्याठिकाणी एकच जल्लोष झाला. पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह. भ. प. शांताराम एकनाथ मोरे, विश्वस्त सुनील दिगंबर मोरे, अभिजित बाळकृष्ण मोरे, जालिंदर विश्वनाथ मोरे, सोहळाप्रमुख अशोक बाळकृष्ण मोरे आदींनी गोल रिंगण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या अश्वासह बाभुळगावच्या अश्वासाठी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रारंभी मोहिते-पाटील परिवाराच्यावतीने अश्वांचे पूजन करण्यात आले.

 

Story img Loader