मनसेच्या कार्यकर्त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मोबाईल संभाषणाची एक ऑडिओ क्लिपदेखील शेअर केली आहे. हे संभाषण मनसे कार्यकर्ता तसेच वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर यांच्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?

वसंत मोरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मी पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो, तर असा कोणता गुन्हा केला की मनसेचे कार्यकर्ते माझा खून करण्यापर्यंत गेले? असं वसंत मोरे म्हणाले. तसेच याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मागणी करत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा – “वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”

वसंत मोरेंनी शेअर केलेल्या संभाषणात काय?

वसंत मोरेंनी शेअर केलेलं संभाषण हे मनसे कार्यकर्ता आणि वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर यांच्यातील असल्याचे सांगितलं जात आहे. या संभाषणानुसार, मनसे कार्यकर्ता वसंत मोरेंना या महिन्यात मारण्याची धमकी देताना दिसून येत आहे.

हेही वाचा – “काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र!

वसंत मोरे माजी मनसे सैनिक

कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख होती. ते राज ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांच्या पैकी एक होते. मात्र, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या या कारवाईनंतरच ते नाराज असल्याचं सांगितले जात होते. त्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिट्ठी देत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, या निडणुकीत त्याचा पराभव झाला झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता.

Story img Loader