लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालित या वर्षांची वसंत व्याख्यानमाला गुरुवार दि १ मे पासून सुरू होत असून या वर्षी २१ मे पर्यंत होणार आहे. डॉ. हमीद दाभोळकर यांच्या व्याख्यानाने प्रारंभ होणार असून ‘होणार सून मी या घरची’ मधील अभिनेता शशांक केतकर यांच्या मुलाखतीने समारोप होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंकर यांनी दिली.
वाईच्या वसंत व्याख्यानमालेचे हे ९७ वे ज्ञानसत्र आहे. या व्याख्यानमालेला केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बाबा पटवर्धन, अशोकराव भट आदी नेतृत्वाचा मोठा हातभार या लाभला आहे. लोकमान्य टिळक स्मारक संस्था या व्याख्यानमालेचे नियोजन करते.
महागणपती घाटावर दररोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या वर्षीच्या ज्ञानसत्रात १ मे रोजी डॉ. हमीद दाभोळकर (सातारा)- विवेकाचा वसा, या विषयावरील पहिले पुष्प गुफतील. २ मे सुभाष देशमाने (सांगली)-जागतिक तापमानात वाढ, ३ मे आरती पाटील(पुणे) -नासाचे अनुभव, ४ मे दीपक कान्हेरे (फलटण) -पर्यायी ऊर्जा, ५ मे सुनील चिंचोळकर (पुणे)-तणावमुक्त जीवन, पिंपरी चिचवड पालिकेचे माजी उपायुक्त श्रीकर परदेशी यांची मुलाखत डॉ. शंतनु अभ्यंकर हे भ्रष्टाचारमुक्त भारत या विषयावर घेणार आहेत. ७ मे विवेक वेलणकर (पुणे)-नागरिक हो जागे व्हा. ८ मे अविनाश लेले(पुणे)- आयुर्वेदाचा विश्वसंचार. ९ मे गिरिजा शिंदे चव्हाण (पुणे)- महिलांनो यशस्वी उद्योजक व्हा. १० मे राजलक्ष्मी कदम (कोल्हापूर) -स्पर्धा परीक्षा युवकांचे भवितव्य. ११ मे चंद्रसेन टिळेकर(अंधेरी)- लो टिळक, सावरकर, फुले यांचा आम्ही पराभव केला. १२ मे डॉ सुधाकर पेटकर(संगमनेर) -योग आणि आरोग्य. १३ मे डॉ न.म. जोशी(पुणे) -२१ व्या शतकातील सांस्कृतिक आव्हाने. १४ मे किसनशेठ भिलारे (पाचगणी) -शेतकरी श्रीमंत कसा होईल. १५ मे अशोक बबन भोसले (अकलूज)-आजच्या युवकांपुढील समस्या. १६ मे श्रीमती रजीया पटेल(पुणे)- राष्ट्रीय एकात्मता सलोख्याची सूत्रे, १७ मे डॉ. आर एन शुक्ल (पुणे)-अध्यात्म आणि विज्ञान. १८ मे नागरी परिसंवाद(वाई)नागरी समस्यांबाबत नगराध्यक्षा मुख्याधिकारी व नागरिक. १९ मे रोजी राजकीय विश्लेशक प्रकाश पवार (कोल्हापूर)निवडणुका २०१४, २० मे रिझव्र्ह बँकेतील निवृत्त अधिकारी के सी मिश्रा(पुणे) ‘सामान्य माणसाचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान’ या विषयावर बोलणार असून २१ मे रोजी ‘होणार सून मी त्या घरची’ मधील श्री व जान्हवी हे कलाकार शशांक व तेजस्विनी केतकर, लक्ष्मीकांत रांजणे व इतरांनी घेतलेल्या या प्रकट मुलाखतीनंतर या सत्राची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंकर यांनी दिली. या वेळी उपाध्यक्ष सदाशिव फडणीस, कार्यवाह वसंत बोपर्डीकर, संचालक विवेक पटवर्धन, दत्ता मर्ढेकर व विश्वस्त सुनील िशदे उपस्थित होते. यापुढे दरवर्षीच्या व्याख्यानमालेत नागरिकांची भाषेवरील रुची वाढवण्यासाठी इंग्रजी व हिदी भाषेतील व्याख्यान आयोजित करण्याचा मानस असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.
वाईतील वसंत व्याख्यानमाला उद्यापासून
लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालित या वर्षांची वसंत व्याख्यानमाला गुरुवार दि १ मे पासून सुरू होत असून या वर्षी २१ मे पर्यंत होणार आहे. डॉ. हमीद दाभोळकर यांच्या व्याख्यानाने प्रारंभ होणार असून ‘होणार सून मी या घरची’ मधील अभिनेता शशांक केतकर यांच्या मुलाखतीने समारोप होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद अभ्यंकर यांनी दिली.
आणखी वाचा
First published on: 29-04-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant vyakhyanmala in wai