सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष खा. विशाल पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक मंडळाची अविरोध निवड झाली. कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळी बोलविण्यात आली होती.

विशाल चौगुले यांनी खा. पाटील यांच्या अध्यक्षपदाचा ठराव मांडला. त्याला यशवंत पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा ठराव गणपत सावंत यांनी मांडला, तर दौलत शिंदे यांनी याला अनुमोदन दिले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मावळे व सहायक निवडणूक अधिकारी विजय पाटील यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड जाहीर केली. सर्व संचालकांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले, तर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.

Story img Loader