साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. पर्यटक तसंच गर्दीतील हुल्लडबाजांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सांगली: भरधाव टॅंकरच्या धडकेत एक महिला ठार तर दुसरी गंभीर जखमी; दोन दुचाकींचा चुराडा

नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी मोठ्या प्रमाणात करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. निसर्ग व वन्य जीवांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीसुध्दा तीन दिवस वासोटा किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

हेही वाचा- सांगली: सागरेश्वरमध्ये दोन हरणांचा मृत्यू

साताऱ्यातील बामणोली परिसरात असलेला वासोटा किल्ला हा नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तेव्हा पर्यटकांनी पुढील तीन दिवस किल्ल्यावर प्रवेश करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे वनविभागाने कळविले आहे. वन विभागाने कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना याबाबत सूचना दिली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररित्या आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.