हीरकमहोत्सव साजरा करणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीताशी संबंधित लघुपट महोत्सव आणि नामवंत कलाकारांशी संवाद साधणारा ‘अंतरंग’ या उपक्रमांबरोबरच गेल्या सहा दशकांतील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी संगीतप्रेमी रसिकांना लाभणार आहे.
ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांना यंदाचा वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. ३५ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.
‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ हे उपक्रम १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत सवाई गंधर्व स्मारक येथे सकाळी साडेदहा वाजल्यापासून होणार आहेत. विविध संकल्पनांवर आणि कलाकारांवर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी संकलित केलेल्या त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन या वेळी आयोजित केले जाणार आहे.
खाँसाहेबांनी लिहिलेल्या काही पत्रांतील मजकूरही पाहण्यास मिळेल. त्यातून त्यांचे सांगीतिक विचार जाणून घेता येतील, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि ‘इंडियन मॅजिक आय’चे श्रीरंग गोडबोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.  
‘वॉक थ्रू’ विभागामध्ये पाच भव्य दूरचित्रवाणी संचावरून महोत्सवातील विविध खास छायाचित्रांचे स्मरणयात्रा प्रदर्शन त्याचप्रमाणे पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न मिळाल्यानंतरचे त्यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शन, गंगुबाई हनगळ, पं. फिरोज दस्तूर यांना आदरांजली म्हणून भरविलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येईल.
कलाकारांच्या कलेचा चांगल्या प्रकारे रसास्वाद घेता यावा यासाठी महोत्सवात प्रथमच पाच भव्य एलईडी भिंती उभ्या केल्या जाणार आहेत. नेपथ्यकार श्याम भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत भागाची सजावट केली जाणार आहे.
हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त पं. भीमसेन जोशी यांना दीर्घकाळ साथसंगत केलेल्या पुरुषोत्तम वालावलकर, नाना मुळे, तुळशीदास बोरकर आणि माउली टाकळकर या ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सतारवादक पं. अरिवद पारिख आणि ज्येष्ठ गायिका-गुरू उषा चिपलकट्टी यांच्यासह दिवंगत कलाकारांच्या कुटुंबीयांचाही यथोचित गौरव केला जाणार आहे.    

तासातच संपली खुच्र्याची तिकिटे
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीट विक्री शिरीष ट्रेडर्स, नावडीकर म्युझिकल्स, दिनशॉ अँड कंपनी आणि बेहरे बंधू आंबेवाले या चार ठिकाणी मंगळवारी खुली झाली. मात्र, महोत्सवाची तिकिटे मिळवण्यासाठी रसिकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. केवळ एका तासामध्येच खुच्र्याच्या तिकिटांची विक्री संपली असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध

‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ उपक्रमांबरोबरच दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन
 ‘षड्ज’मधील लघुपट
जगत मुरारी यांचा भरतनाटय़ावरील लघुपट
घनश्याम मोहपात्रा यांचा ‘म्युझिक-डान्स अँड कल्चर’
ए. भास्कर राव यांचा ‘म्युझिक ऑफ इंडिया-क्लासिकल’
लोकसेन ललवाणी यांचा ‘अंतर यात्रा’ आणि ‘ओम नम: शिवाय’
रजत कपूर यांचा ‘तराणा’
गुलजार दिग्दर्शित उस्ताद अमजद अली खाँ
अमर वर्मा यांचा ‘सितारा’
श्याम बेनेगल यांचा ‘ताल’ आणि ‘मृदंग’

 ‘अंतरंग’मधील उपक्रम
ज्येष्ठ तबलावादक पं. स्वपन चौधरी यांच्याशी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचा संवाद.
सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सचे डॉ. सुरेश चांदवणकर यांच्याशी संवाद.

Story img Loader