लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने आज (ता.२ एप्रिल) पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारी संदर्भात चर्चा केली होती. यानंतर अखेर वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवरून दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तसेच भाजपाकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात आहेत. आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचीदेखील भेट घेतली होती. तसेच खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी या भेटी पुण्यातून उमेदवारी मिळण्यासंदर्भात घेतल्याचे सांगितले जात होते.

Manish Sisodia Janpura Vidhan Sabha Election 2025 Results
Manish Sisodia Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मनिष सिसोदियांचा पराभव; प्रतिक्रिया देत म्हणाले, “६०६ मतांनी मी…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Total BJP Winner Candidate List Delhi Election Results 2025
BJP Winner Candidate List Delhi Election: कोण आहेत भाजपाचे विजयी उमेदवार, वाचा संपूर्ण यादी
Delhi Winner Candidate List: Check here
Delhi Election Results 2025 Winner List: दिल्लीचं ठरलं, आपला नाकारलं, भाजपाची प्रतीक्षा संपली; वाचा निकालाची संपूर्ण यादी!
Supriya Sule latest news in marathi
मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप

हेही वाचा : “सर्व ताकद आमच्याकडे असताना आम्ही जागा का सोडू?”, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावरून नारायण राणेंचा थेट सवाल

‘वंचित’ने कोणत्या पाच उमेवारांची घोषणा केली?

वंचित बहुजन आघाडीने आघाडीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये अविनाश भोसिकर-नांदेड (लिंगायत), बाबासाहेब भुजंगराव उगले-परभणी (मराठा), अफ्सर खान-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (मुस्लिम), वसंत मोरे-पुणे (मराठा), मंगलदास बांदल-शिरुर (मराठा), या पाच उमेदवारांची यादी ट्विटरवरुन जाहीर केली आहे.

Story img Loader