“मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश कायदेशीर कसोटीवर टिकल्यानंतरच तो मान्य होईल. कारण ओबीसी आणि मराठा हे दोन गट एकमेकांविरोधात हरकती नोंदवत आहेत. आमची भूमिका आहे की, मराठा समाजाची गेल्या ७० वर्षांतील सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. आज ज्यांना निजामी मराठे म्हटले जाते, तो मुघलांबरोबर राहिले होते. जे आज आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसह होते. या दोघांमध्ये जात हा समान दुवा असला आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असे नाही”, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

मराठ्यांच्या आरक्षणासाठी सत्ता हवी

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सविस्तर भाष्य केले. “रयतेचे मराठे आणि मोगलाई मराठे यांच्यात आजही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. यांच्यात सामाजिक एकत्रीकरण झालेले नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांना वेगळे काढले जाऊ शकते का? तर तशी शक्यता आहे. पण त्यासाठी सत्ता हाती लागेल आणि त्यामुळेच जनतेने आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Devendra Fadnavis assurance in investigation in Chandrapur district cooperative bank recruitment
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; पोतराजेंच्या उपोषणाची सांगता
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Omprakash Rajenimbalkar likely to join Mahayuti minister Pratap Sarnaik
“खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!”, पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत
Udayanraje Bhosale statement On Chhaava Movie release
आक्षेपार्ह बाबी वगळून ‘छावा’ प्रदर्शित करावा : उदयनराजे
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदेंची गरज संपली, आता नवा उदय पुढे येणार”, वडेट्टीवारांचा मोठा दावा; म्हणाले, “दोन्ही बाजूला…”
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…

“नाभिक समाजाने मराठ्यांवर…”, भुजबळांच्या त्या आवाहनावर जरांगे पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

बहिष्कार घालण्याची भाषा चुकीची

छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला आवाहन करून मराठा समाजावर बहिष्कार घालण्याची भाषा केली. त्याचा आंबेडकरांनी निषेध केला. “ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये कटुता आलेली आहे. हे नाकारून चालणार नाही. पण कोणत्याही समाजाचा नामोल्लेख करून अजून भांडण वाढवणे, ही वृत्ती अतिशय घातक आहे. मी त्याचा निषेध करतो. कारण वाळीत टाकणं आणि राहणं, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मतभेद आहेत, हे मी मान्य करतो. पण शत्रूत्व असता कामा नये.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ला मराठ्यांना आरक्षण मागितले

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर आमच्याबाजूने आहेत, असे विधान एल्गार परिषदेत केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्यापरिने उचलण्याचा प्रयत्न दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील आपल्याला हवा, तेवढाच भाग उचलला जातो. पूर्ण आंबेडकर कुणीही स्वीकारत नाही. सायमन कमिशनला बाबासाहेबांनी जो खलिता सादर केला होता, त्यामध्ये रयतेतील मराठ्यांना इतरांप्रमाणे सवलती मिळाल्या पाहीजेत, असे १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.

केरळमधील युवा संमेलनात ‘भारत माता की जय’ घोषणेस नकार; केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी संतापल्या, म्हणाल्या…

बाबासाहेब समाजशास्त्राचे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले होते की, मराठा ही ओळख निर्माण होत असताना भविष्यात त्याला राजकीय महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे सर्वच मराठे एकत्र येणार नाहीत. मोगलाईतील मराठे सर्वच स्वतःच्या ताब्यात ठेवून इतरांचा वापर करतील. हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी रयतेतील मराठ्याला आरक्षण देण्याची त्यांची भूमिका होती. ज्या ज्या समाज घटकांना सरकारची मदत लागेल, त्यांना मदत मिळवून देताना त्या त्या सरकारांना निवेदने दिले होते, असा ऐतिहासिक दाखला प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

Story img Loader