Prakash Ambedkar Statement on Sharad Pawar: महाराष्ट्रात मणिपूरसारखं काहीतरी घडू शकतं असं म्हणत काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र शरद पवारांचं हे वक्तव्य आग लावणारं आहे अशी टीका आता प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसंच मनोज जरांगे यांनाही प्रकाश आंबेडकरांनी मोलाचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीने आरक्षणासाठीची यात्रा काढली आहे. त्यादरम्यान प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) हे वक्तव्य केलं.

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

“मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. परंतु, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं अंसं वाटलं नाही. ते तिकडे गेले नाहीत. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं, कर्नाटकातही घडलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांमुळे आपलं राज्य वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती करत राहिलं आहे.” असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी टीका केली आहे. तसंच मनोज जरांगेंनाही सल्ला दिला आहे.

What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
dattatreya hosabale
बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आवश्यक, स्थलांतर न करण्याचे होसबाळे यांचे आवाहन
NCP announced candidate from Sharad Pawar group in Murtijapur constituency there is split in party
राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटन सचिवाची सोडचिठ्ठी…सम्राट डोंगरदिवेंसमोर डोंगराएवढे…
ajit pawar harshvardhan patil devendra fadnavis
“मी, हर्षवर्धन पाटील व फडणवीस सागर बंगल्यावर…”, अजित पवारांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; ‘अदृश्य प्रचारा’वरून टोला!
zeeshan siddique post
“माझे वडील बाबा सिद्दिकींनी नेहमीच…”; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर झिशान सिद्दिकींची पोस्ट!
Manohar chandrikapure
अजित पवारांच्या नाराज आमदाराची प्रथम काँग्रेसकडे धाव, नंतर प्रहारमध्ये प्रवेश, महायुतीमध्ये बंडाचा झेंडा
chiplun Sangameshwar assembly constituency We will get to see fight like NCP vs NCP
चिपळूण-संगमेश्वर मधील राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी लढतीत मुस्लीम मते निर्णायक ठरणार

हे पण वाचा- Maratha Reservation : “…तर तुमचा पक्ष गुंडाळून टाका”, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना सल्ला; उद्धव ठाकरेंनाही सुनावलं

प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंबाबत नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी जी मागणी केली आहे की मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं. यामुळे गावांमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट मराठा समाजाचा आहे ज्या गटाने मनोज जरांगेंना पाठिंबा दिला आहे. दुसरा गट ओबीसींचा आहे तो या गटाच्या विरोधात आहे. या गटांमधले मतभेद इतके टोकाला पोहचले आहेत की मराठा समाज म्हणतो की आम्ही ओबीसी उमेदवारांना मतदान करणार नाही. ओबीसी समाज म्हणतो मराठा उमेदवारांना मतदान करणार नाही. आमच्या आता हे लक्षात आलं आहे की काही जण त्याचा फायदा घेऊन या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. आरक्षण कोण देऊ शकतं? त्याचा फायनल निकाल कुणाचा? याची जागरुकता निर्माण करण्यासाठी ही यात्रा काढत आहोत. असंही प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले आहेत.

आम्ही गरीब मराठ्यांशी संवाद साधत आहोत

गरीब मराठ्यांशी आम्ही संवाद साधत आहोत. नेमकं भांडण कुणाचं आहे? ओबीसी आणि मराठ्यांचं आहे की श्रीमंत आणि गरीब मराठ्यांचं भांडण आहे. मनोज जरांगेसह जो मराठा आहे तो असं म्हणतो आहे की आम्हाला डावलण्यात आलं. आम्हाला कुठलीही साधनं मिळाली नाही. तेव्हा आमचा प्रश्न असा असतो की ओबीसी सत्तेत होता का? त्यांच्याकडे साधनं होती का? तर तसं झालेलं नाही. उलट श्रीमंत मराठ्यांकडे सत्ता होती. बऱ्याच प्रमाणात या गोष्टी लोकांना समजत आहेत. असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले.

Prakash Ambedkar News
प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका आणि मनोज जरांगेंना सल्ला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

शरद पवारांचं वक्तव्य आग लावणारं

मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद लावण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. शरद पवारांचं स्टेटमेंट आलं महाराष्ट्राचा मणिपूर करु नका. त्यांचं हे वक्तव्य आग लावणारं आहे. उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा आणि जागा वाढवून घ्या त्यानंतर मराठ्यांना ओबीसीत घेऊ आणि आरक्षणाकडे नेऊ. हे बोलणं चिथावणी देणारं आहे. अशी अनेक वक्तव्यं येत आहेत, ज्यातून चिथावणी मिळते आहे. मात्र जनतेचं कौतुक करेन की राजकीय मतभेदांमध्ये जनता पडत नाही. आमचं जनतेला आवाहन आहे, गरीब मराठ्यांना आवाहन आहे की आम्हाला ओबीसींबरोबर सत्तेवर बसवा आम्ही सत्तेत आलो की आम्ही आरक्षणावरचा मार्ग काढू. मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असेल.असंही प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) स्पष्ट केलं.