Prakash Ambedkar : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मागील एक ते दीड वर्षापासून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं आणि सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण हवं असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तर ओबीसी समाजाने आमच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. अशात आता प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे असं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. कुणबी हे स्वतःला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसह आहे असं आमदार सांगतो. याचाच अर्थ तो आमदार धनगरांबरोबर, माळी समाजाबरोबर, वंजारी, लिंगायत, बंजारा समाजाबरोबर नाही. तसंच तो तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर तर अजिबात नाही” असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) म्हणाले.

congress mla vikas thackeray reply to shivsena ubt leader sushma andhare
नागपूर हिट अँन्ड रन: कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे – सुषमा अंधारे यांच्यात जुंपली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
praskash ambedkar vidhansabha election support
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
dr babasaheb ambedkar Photograph torn jitendra awad moved to high court
मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
mukesh ambani
अल्पकालीन नफा ‘रिलायन्स’चे लक्ष्य नाही – अंबानी
prakash ambedkar
लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला; प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न

ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे

मी तुम्हाला जे सांगतो आहे ते लक्षात घ्या. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. हा धोका १०० टक्के आहे. निवडणूक पार पडल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरु नका. तसंच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.”कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधीमंडळ सभागृहात १९० कुणबी मराठा आमदार आहेत. तर ओबीसी आमदार हे फक्त ११ आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे.” असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) हे आरक्षणाच्या मुद्द्यावर रोज भाष्य करत आहेत. शनिवारीच त्यांनी शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात आग लावण्याचं काम करत आहेत असं प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटलं होतं.

हे पण वाचा- Prakash Ambedkar : “उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “भांडणं मिटवण्याऐवजी…”

शरद पवारांबाबत काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद लावण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. शरद पवारांचं स्टेटमेंट आलं महाराष्ट्राचा मणिपूर करु नका. त्यांचं हे वक्तव्य आग लावणारं आहे. उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा आणि जागा वाढवून घ्या त्यानंतर मराठ्यांना ओबीसीत घेऊ आणि आरक्षणाकडे नेऊ. हे बोलणं चिथावणी देणारं आहे. अशी अनेक वक्तव्यं येत आहेत, ज्यातून चिथावणी मिळते आहे. मात्र जनतेचं कौतुक करेन की राजकीय मतभेदांमध्ये जनता पडत नाही. असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी नवं विधान केलं आहे. ओबीसी आरक्षण १०० टक्के धोक्यात आहे असं त्यांनी ( Prakash Ambedkar ) म्हटलं आहे.

Prakash Ambedkar News
प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका आणि मनोज जरांगेंना सल्ला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

मनोज जरांगे म्हणाले आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार

“माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. मात्र ते आता नवीन काय मुद्दा काढत आहेत? माहीत नाही. गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. गोरगरीबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतो आहे. गरीबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजेत.” असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं.