आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी अद्याप मविआच्या चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत. अजूनही प्रकाश आंबेडकर मविआमध्ये आहेत की नाहीत? याविषयी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रकाश आंबेडकरांच्या आगामी भूमिकेबाबत तर्क-वितर्क लावले जात असताना दुसरीकडे इचलकरंजीमध्ये शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदी व भाजपासह काँग्रेसवरही टीकास्र सोडलं. यावेळी काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर असल्याची गंभीर टीका त्यांनी केली.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकरांनी या सभेत बोलताना मोदी व भाजपावर टीका करण्याबाबत काँग्रेसवर हल्लाबोल केला. “काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं की ‘त्यांच्या पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षांनी मोदींच्या घरासमोर धरणं द्यावं. त्यांना एवढंच सांगावं की हिंदूंना एकत्र येण्याचा सल्ला तुम्ही देताय, तर आधी तुमच्यापासून सुरुवात करा. पती-पत्नी एकत्र राहायला शिका’. आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागलेत की भाजपासमोर आपण लढलं पाहिजे. आधी लढायला तर शिका आणि मग उपदेश द्या”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

“काँग्रेसा एक लाट उभी करण्याची संधी होती, पण…”

“भाजपा सरकार संविधान तुडवायला निघालं आहे. काँग्रेसच्या यात्रेत चातुर्वर्ण्याच्या विरोधात, समतेच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने संदेश आहे का? एक लाट उभी करण्याची संधी आली होती, ती सोडून द्यायची आणि जे मोदींविरोधात लढत आहेत, त्यांच्याविषयी शंका निर्माण करायच्या”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींच्या यात्रेलाही लक्ष्य केलं.

Video: बारामतीत नेमकं चाललंय काय? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांची गळाभेट; अनेकांच्या भुवया उंचावल्या!

“काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर…”

काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिलाय. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठलातरी राज्यपाल म्हणून जाशील. काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबहाद्दर आहेत”, असं प्रकाश आंबेडकर इचलकरंजीच्या सभेत म्हणाले.

“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Story img Loader