वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यात युती झालेली आहे. ही युती आगामी मुंबई पालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत असेल. या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीविषयी केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना यश येणार का? राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करायची असेल तर मग त्याच पक्षाविरोधात बोलून काय साध्य होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. यावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट उत्तर दिले आहे. मोदी, भाजपा फार मोठी गोष्ट नाही, म्हणत प्रकाश आंबेडकरांनी विजयाचे गणित मांडले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा >>> अजित पवार म्हणतात वंचितला सोबत घेण्यास तयार, मग नेमकी अडचण काय? प्रकाश आंबेडकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले “आज आम्ही…”

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Prime Minister Narendra Modi assertion that he is determined to create Singapores in India
भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
man attempt suicide by shooting himself due to a love affair
प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
Suicide attempt due to mental stress is not a crime
मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही…

“२०१९ साली काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आम्हीच प्रयत्न केला. २०१९ साली तुम्ही वंचितला का नाकारले असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारायला हवे. मी आज चॅलेंज देऊन सांगतो की मी ज्या आघाडीसोबत जाईल तसेच ती आघाडी माझ्यासोबत प्रामाणिक राहिली, तर माझ्यासमोर नरेंद्र मोदी आणि भाजपा फार मोठी गोष्ट नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टकीरण, म्हणाले, “हा आरोपी…”

तसेच विजयाचे गणित मांडताना “१५ टक्के मतं मी माझ्या आजोंबाच्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) जोरावर सांभाळू शकतो. त्याचा वापर मी फक्त एकदाच केला. मी व्ही पी सिंह यांच्यावेळी मी याचा वापर केला. आरएसएस, भाजपा स्वत:च्या भूमिकेमुळे १४ टक्के मुस्लीम मते गमावलेली आहेत. मला हे दोन मतं जोडायला फार वेळ लागत नाही. आता हे दोन्ही मतं मोजली तर हा टक्का ३० टक्के होतो. मला जिंकायचे असेल तर ३७ टक्के मतं मिळवावे लागतील. त्यामुळे मी माझी ताकद ओळखून आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.