वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यात युती झालेली आहे. ही युती आगामी मुंबई पालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत असेल. या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीविषयी केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांना यश येणार का? राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करायची असेल तर मग त्याच पक्षाविरोधात बोलून काय साध्य होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. यावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट उत्तर दिले आहे. मोदी, भाजपा फार मोठी गोष्ट नाही, म्हणत प्रकाश आंबेडकरांनी विजयाचे गणित मांडले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा