‘वेदान्त’ कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी गुजरातला ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ कंपनीचा प्रकल्प उभारण्यासंदर्भातील आपल्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना भविष्यात महाराष्ट्रामध्येही यासंदर्भातील संलग्न प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. ट्विटरवरुन अग्रवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया नोंदवताना विरोधकांना विशेष करुन शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा असा खोचक सल्ला फडणवीस यांनी १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरुन टीका करणाऱ्या शिवसेनेला दिला आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘वेदान्त-फॉक्सकॉन’च्या माध्यमातून गुजरातमध्ये सुरु करण्यात येणारा कारखाना हा पहिला टप्पा असल्याचं अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन चार वेगवेगळ्या पोस्ट करत स्पष्ट केलं आहे. यापैकी शेवटच्या ट्वीटमध्ये अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचं सांगत भविष्यात राज्यात मोठी गुंतवणूक केली जाईल असे संकेत दिले आहेत. “भारतीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा दशा आणि दिशा बदलणारी ही कोट्यवधी रुपयांची दिर्घकालीन गुंतवणूक आहे. आम्ही देशभरात परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. गुजरातपासून हा प्रवास सुरु होत आहे. देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे,” असं अनिल अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अनिल अग्रवाल यांनी बुधवारी रात्री ट्वीटरवरुन ही घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुनच त्यांचे आभार मानले असून एक राज्य म्हणून महाराष्ट्र कायमच व्यवसायपूरक असेल असा शब्दही दिला आहे.”‘वेदान्त-फॉक्सकॉन’च्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू,” असं आश्वासन फडणवीस यांनी ‘वेदान्त’चे मालक अनिल अग्रवाल यांनी केलेल्या ट्वीटला रिप्लाय करताना दिलं आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”
याच ट्वीट थ्रेडमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या मूळ प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्याबद्दल होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य करताना फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत,” असं फडणवीस यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणतात, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
केवळ टीकच नाही तर फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य करताना नाणार रिफायनरी प्रकरणावरुन प्रश्नही उपस्थित केला आहे. “माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून ‘वेदान्त समूह’ आणि महाराष्ट्र सरकारदरम्यान या प्रकल्पाबाबत चर्चा सुरू केली होती. राज्यातील सत्तांतरण नाट्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘वेदान्त समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली. ‘‘वेदान्त आणि तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ कंपनीची भागीदारी झाली असून, या माध्यमातून राज्यात तीन टप्प्यांत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाअंतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे,’’ असे शिंदे-फडणवीस सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र मंगळवारी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ने प्रकल्प गुजरातमध्ये उभारत असल्याचं जाहीर करत गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केले. यावरुनच राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं आहे.