पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. निगडी येथे रात्री आठ ते दहा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी धारदार शस्त्र आणि दगडाच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या चोवीस तासातील ही दुसरी घटना असल्याने पसिरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

याआधी भोसरीत 18 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. एकीकडे तोडफोडीचं सत्र सुरु असताना पोलीस मात्र तपासात अपयशी ठरत आहेत.

Story img Loader