महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज (२७ जुलै) आठवा दिवस होता. आजच्या दिवशी विधान परिषदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात मोठी शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले. त्यावर उपसभापतींनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. बराच वेळ पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद सुरू होता. परंतु, सत्ताधारी भाजपाचे आमदार, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री मात्र शांतपणे सगळं काही बघत बसले होते. अखेर विरोधी पक्षातील आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी उपसभापतींनी पडळकरांवर कारवाईचा बडगा उगारला.

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी साधारणतः ८ ते १० मिनिटं दिली जातात. परंतु, गोपीचंद पडळकर १३ मिनिटं बोलत होते. उपसभापतींनी आठवण करून दिल्यावरही ते बोलत राहिले. उपसभापतींनी पडळकरांना तीन वेळा सूचना देऊनही ते बोलत राहिले. प्रत्येक वेळी सूचना देताना त्यांना दोन-दोन मिनिटं वाढवून देण्यात आली. तरीसुद्धा पडळकर थांबत नव्हते. तसेच मला अजून वेळ हवा आहे, असंही सांगत होते. माझे अजून दोन-तीन विषय बाकी आहेत, असं ते बोलत होते.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

तीन वेळा सूचना देऊनही पडळकर थांबत नव्हते, त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे पडळकरांना म्हणाल्या, “सभागृहाला वेठीस धरू नका”. त्यावर पडळकर म्हणाले, “तुम्ही नियोजन नीट करत नाही, उगाच वाद घालता”. यावेळी पडळकरांचा आवाज वाढला होता. इथूनच दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली.

पडळकरांचा आवाज वाढल्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना ताकीद दिली. त्यावर “तुम्ही काय ताकीद देणार?” असं म्हणत पडळकरांनी हातात असलेले कागद फाडले. तर नीलम गोऱ्हे त्यांना म्हणाल्या, “तुम्ही धमक्या देऊ नका”. त्यावर पडळकर काहीतरी पुटपुटले. तर उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुमच्या डोक्याचा स्क्रू ढिल्ला झालाय ते बघा आधी”.

हा वाद वाढत असताना सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाचे नेते मात्र शांत बसून हे सगळं पाहत होते. भाजपा आमदार सुरेश धस पडळकरांना तुम्ही बोला असं हाताने खुणवत होते. अखेर वाद चिघळू लागल्याचं पाहून विरोधकांनी यात हस्तक्षेप करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा >> “सभागृहात त्याला जाम हाणला”, अबू आझमींबरोबरच्या वादानंतर भाजपा आमदाराची पोस्ट चर्चेत

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापतींकडे पडळकरांना आणखी एक मिनिटभर बोलू द्या, अशी विनंती केली. त्यानुसार पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांनी पडळकरांना दोन मिनिटं दिली. यावेळीसुद्धा पडळकर दोन मिनिटं झाली तरी बोलतच राहिले, ते थांबण्याचं नावच घेत नव्हते. अखेर गोऱ्हे यांनी पडळकरांचा माईक बंद करण्यास सांगितलं. नीलम गोऱ्हे पडळकरांना म्हणाल्या, उद्या दिवसभरात तुम्हाला बोलायला वेळ देणार नाही.