अभ्यासू कलाशिक्षक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी(वय-७७) यांचे आज (सोमवार) ब्रेन हॅमरेजने निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ डिसेंबरपासून शाहू स्मारक भवन येथे सुमित्रा भावे स्मृती महोत्सव सुरु झाला. दुसर्‍या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे आज निधन झाले.

कोल्हापूरातील कला क्षेत्राबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान होते. नाना पाटेकर आणि स्मिता पाटील अभिनीत सूत्रधार या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीस सुरूवात केली. टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी, जगज्जनी श्री महालक्ष्मी असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांंच्या संहितांचे लेखन केले. जीवनसंध्या दृष्ट यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे ते संचालक होते. येथे झालेल्या ६३ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.

त्यांनी ३५ वर्षे कलाशिक्षक म्हणून काम केले आहे.जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. दिल्लीतील संगीत नाटक अकादमीच्या ‘काश्मिरच्या लोककलेचा अभ्यास‘ या प्रकल्पावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. कला, शिल्पकला याच्या अभ्यासासाठी त्यांनी इटली देशाचा दौरा केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, समन्वयक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम केले. शिवाजी विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे पत्रकारिता शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सन सयीचा वारा या त्यांच्या काव्यसंग्रहास कदंब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेते ऋषिकेश व परिवार आहे.