लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : जेष्ठ साहित्यिका शोभा डे यांनाही अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली आहे. त्यांनी अलिबाग आवास जवळ असलेल्या एका गृह प्रकल्पात ८ कोटी ३० लाख रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला आहे.
अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आज त्यांनी या व्यवहाराची नोंदणी केली. यावेळी त्या स्वतः आणि त्यांचे निवडक सहकारी उपस्थित होते. २ हजार चौरस फुटाच्या घरासाठी त्यांनी ५० लाख १० हजार रुपयांचा मुद्रांक शुल्कही भरला आहे. या पुर्वी याच गृहनिर्माण प्रकल्पात क्रिकेटपटू विराट कोहोली आणि अभिनेता राम कपूर आणि गौतमी कपूर यांनीही घरखरेदी केली आहे.
आणखी वाचा-प्रेमसंबंधातून तरूणाचा कट रचून खून; गुन्ह्याची तीन वर्षांनी उकल
महत्वाची बाब म्हणजे शोभा डे यांचे हे अलिबाग मधील दुसरे घर आहे. यापुर्वी त्यांनी चोंढी येथे एका शेतघराची खरेदी केली होती. गेल्या काही वर्षात अभिनेता शाहरुख खान, जुही चावला, रणवीर आणि दिपीका कपूर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहीत शर्मा यांनी अलिबाग येथे आलिशांन घरांची खरेदी केली आहे.