स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत आज (गुरूवार) महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ध्वजारोहण करण्यात आले. ‘व्ही कॅन’द्वारा विदर्भ आंदेलनासाठी तयार करण्यात आलेल्या झेंडय़ाद्वारे याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शवणारा काळा, वन संपदेचा हिरवा, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा आणि जय विदर्भ ही घोषणा या झेंडय़ावर दर्शवण्यात आली आहे. याशिवाय भारताच्या तिरंग्याचेही यावर प्रतीक आहे. एकूणच विदर्भ राज्य हे किती सक्षम आहे, हे या झेंडय़ावरून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘व्ही कॅन’ने एल्गार पुकारला आहे. त्या अंतर्गत नागपुरात सेंट्रल बाजार रोडवरील विष्णूजी की रसोई, येथे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण झाले. यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याचसोबत भंडारा येथील शंकरनगर ग्रऊंड, गोंदियातील सिव्हिल लाईन्स येथील जे.एम. हायस्कूल जयस्तंभ येथे ध्वजारोहण करण्यात आले.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भ कनेक्ट’ ही चळवळ काही महिन्यांपूर्वी सुरू झाली. खोटी आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकीय हेतू साध्य केले. वैदर्भीयांच्या भावनांचा विचार न करता महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. मात्र, विकास होणे तर दूर उलट अन्यायच झाला. वेगळ्या राज्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ‘विदर्भ कनेक्ट’ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात व्ही कॅनने विविध पक्षांच्या उमेदवारांकडून विदर्भाच्या कटिबद्धतेसाठी वचननामा भरून घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र दिन : नागपुरात फडकला ‘जय विदर्भ’चा झेंडा
व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शवणारा काळा, वन संपदेचा हिरवा, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा आणि जय विदर्भ ही घोषणा या झेंडय़ावर दर्शवण्यात आली आहे.

First published on: 01-05-2014 at 02:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha flag unfurled on may 1