वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामधून बंडखोरांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. या भाषणामध्ये धनगर समाजाच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भातील आश्वासने देतानाच शिंदे यांनी बंडखोरांनी क्रांती केल्याचंही म्हटलं. राज्यभरातून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा शिंदेंनी केली. मात्र भाषणामध्ये राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना एका क्षणी शिंदेंनी स्वत:च्याच गळ्यावर हात फिरवत “आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता,” असं विधान केलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

आपल्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर शिंदे यांनी, “राज्यातल्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते येत आहेत मला भेटायला. त्यांना सगळ्यांना वाटतंय की ते सगळे मुख्यमंत्री झाले आहेत. तसं समजायलाही हरकत नाही. हा एकनाथ शिंदे तुमच्यातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्यातून झालेला मुख्यमंत्री आहे,” असं म्हणत सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचल्याचं सांगितलं. “बाळासाहेबांच्या दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही युतीचं सरकार केलं आहे. निवडणूक एकत्र लढवली तसं सरकार पण एकत्र होईल असं वाटलं होतं. एक हजार कोटींच्या योजनांचं नियोजन होतं. पण तसं झालं नाही. मात्र ती दुरुस्ती आता आम्ही हे सरकार स्थापन करुन केलेली आहे,” असंही शिंदे म्हणाले.

SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

नक्की पाहा >> Photos: …अन् आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडली; नंतर त्यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटलं, “सात वर्षात एकदाही…”

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्वच भागांमधून लोक आल्याचं कौतुक करताना शिंदे यांनी, “वाऱ्या पावसामध्येही अनेकजण इथं मला भेटण्यासाठी आले त्यासाठी धन्यवाद देतो,” असंही म्हटलं. पुढे शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारही सर्वसामान्य कार्यकर्तेच असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे घराणेशाहीवर टीका केली. “आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्राचा इतिहास. यापूर्वी वर्षानूवर्ष या सर्वोच्च पदावर आमचाच अधिकार, हक्क आहे असं काही लोकांना वाटत होतं. आपल्यासमोर जो एकनाथ शिंदे उभा आहे त्याच्यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आमच्यासोबत असणाऱ्या आमदारांचीही अशीच स्थिती आहे. म्हणजे कोणाचे वडील मुख्यमंत्री, आमदार, खासदार आहेत असं काहीही नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील या राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतो हे आज राज्यातील जनतेनं पाहिलं आहे,” असं म्हणत शिंदेंनी हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याचा दावा केला.

नक्की वाचा >> “मंत्रीमंडळ स्थापन न झाल्यामुळे…”; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात अजित पवार म्हणाले, “१ ऑगस्ट किंवा…”

आपल्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करताना शिंदे यांनी, “अतिशय दुर्गम भागातील दरेगाव येथे जन्म झाला. या दुर्गम भागातून आम्ही ठाण्यात आलो. प्रचंड मेहनत केली. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रभावित झालो. आनंद दिघेंच्या सहवासात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आम्ही सर्वचजण दिघे साहेबांना जवळून ओळखायचो. हा प्रवास आज राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

आपण मुख्यमंत्री होऊ असा विश्वास मलाही वाटत नव्हता असंही शिंदे यांनी या भाषणात म्हटलं. “मलाही विश्वास नव्हता की मी राज्याच्या मुख्यमंत्री होईल. मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सारं टीव्हीमध्ये पाहिलं असेल,” असं शिंदे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे यांनी पुढे, “तुम्हाला पण धाकधूक लागली असेल. आम्ही सुरुवातीला तीन-चार दिवस झोपलोच नाही. तीन दिवस सतत दिवस-रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता कारण खूप टेन्शन होतं,” असं सांगितलं. डोक्यात त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुरु असल्याचं शिंदेंनी सांगितलं. “आम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता,” असं शिंदेंनी गुवहाटीमधील वास्तव्याचा संदर्भ देत बंडखोरीबद्दल भाष्य करताना म्हटलं.

“परमेश्वर आमच्या पाठीशी होता. बघता बघता सगळे लोक एक एक करत वाढत गेले. ५० लोक एकत्र आले. काही लोक म्हणतात गद्दार, बंडखोर पण आम्ही सांगितलंय की या राज्यात आम्ही क्रांती घडवली आहे. आमच्या क्रांतीची दखल देशाने घेतली. जगभरातील ३३ देशांनी घेतली. आज मी कुठून जातो तर लहान लहान मुलं म्हणतात, ते पाहा एकनाथ शिंदे चालले आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी हसून सांगितलं.

Story img Loader