राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्ये सातत्याने चर्चेत असतात. त्यांची वक्तव्ये हिंदुत्त्वविरोधी असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. शुक्रवारीही त्यांनी अशाचपद्धतीचे वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. “रामजयंती आणि हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच साजरे केले जातात असं वाटायला लागलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड शुक्रवारी शिबिरात म्हणाले. तेव्हापासून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे. त्यांच्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याकरता त्यांनी त्यांच्या मनाताली राम आणि हनुमानाची प्रतिमा आज व्हिडीओद्वारे स्पष्ट केली.

“मला विरोध करणाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की रामाला पाहण्याची दृष्टी का बदलतेय? आई वडिलांचा ऐकणारा राम, आपलं सिंहासन सोडून १४ वर्षांच्या वनवासाला जाणारा राम, एक आदिवासी स्त्री शबरीची बोरं खाणारा राम. जेव्हा स्पर्शही मान्य नव्हता तेव्हा त्या शबरीची बोरं खाणारा राम. हनुमानासह सर्वांमध्ये पुरुषत्व जागं करून सेना बनवणारा राम. संघटन कौशल्य असलेला राम, सेतू बनवणारा राम, एका आदेशावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणून त्यावरील औषधी वनस्पती उपयोगी पडेल ही हनुमानाने करून दाखवले. त्याने लंका जाळली पण, सीतेला नाही आणलं. आदेश असता तर सीतेलाही आणलं असतं. अधर्माचा पराभव केलाच पाहिजे याकरता सेतूवरून जाणारा राम. रावणाचा पराभव केल्यानंतर ते सिंहासन तिथल्या भूमिपूत्राला दिलं. तो राम. राम समजून घेण्याचा विषय आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Friend s wife sexually assaulted
पिंपरी: मित्राच्या पत्नीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अत्याचाराचे चित्रीकरण, पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Loksatta aaptibaar Raj Thackeray Statement on Assembly Elections 2024 winning
आपटीबार: राजसत्तेचे चित्र
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
South Korea s Han Kang
दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना साहित्याचे नोबेल
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!

हेही वाचा >> “रामनवमी अन् हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच…”; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कोणी काहीही बोललं असेल तर…”

“लहानपणी रामजन्मोत्सव छान हसत खेळत साजरा व्हायचा. ज्या पंचवटीत राम राहिले होते. त्या नाशिकचा आहे मी. त्यामुळे मला कोणी राम समजावयला जाऊ नये. लहानपणीचा राम प्रत्येकाने आठवावा. आणि आताच्या रामाचं चित्र पाहा. हा दृष्टीतला बदल आहे. तुम्ही राम बदलवलात. ज्या रामाला मर्यादा पुरूषोत्तम म्हणायचे, ज्याच्या डोळ्यांतच प्रेम दिसायचं, तो अचानक उग्र का झालाय? आणि मग त्याबद्दल प्रश्न विचारला तर काय झाल? हा राम विसरायचा का आपण? राम हा निलवर्णीय, प्रेमळ म्हणून ओळखला जातो. एकवचनी, एकपत्नी म्हणून ओळखला जातो”, असंही आव्हाडांनी पुढे स्पष्ट केलं.

“मागच्या दहा वर्षांत रामनवमी आणि हनुमान जयंतीत दंगल झाले नाहीत. मी जे बोललो तेच माझं म्हणणं, असंही ते पुढे म्हणाले. उत्सव कोणते बदनाम होतायत. दिपावलीची शोभायात्रा निघते, पाडव्याची शोभायात्र आहे. कृष्णाजन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरा करणारा मी माणूस आहे. एक लाख लोक माझ्यासमोर असायचे. त्यात कोण हिंदू, मुस्लिम कळायचंही नाही. शीख समाजातील मुलाने हंडी फोडली आहे. समाजाला एक करण्याकरता आपले उत्सव आहेत. यातून द्वेषाची निर्मिती होऊ नये. त्यावेळेसचा जातीय भेद नष्ट करून शबरीची बोरं खाणारा राम विसरायचा का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“मी माझ्या वक्तव्यावर ठाम असतो. कारण त्याला कारण असतं. मी लॉजिक नसताना बोलत नाही. दहा वर्षांत झालं नाही ते आज झालं. पुढच्या दहा वर्षांत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. फडणवीसांएवढीच श्रद्धा माझ्या मनात आहे. पण रामाचा वापर राजकारणासाठी करत नाही. आईवडिलांचा ऐकणारा, जातीयवाद नष्ट करणारा राम बघतोय मी. चौदा वर्षांनंतर राज्यात आला तेव्हा लोकांचं ऐकणारा राम मी बघतोय. यातील एकही वाक्य चुकीचं असेल तर मला सांगावं. राम या दृष्टीने राम समजून घेऊ शकतो. राम एका कॅरेक्टरसाठी नाही”, असंही आव्हाडांनी ठामपणे यावेळी सांगितलं.