राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारा पद्म पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील १७ जणांचा पद्मश्री आणि दोघांचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला. परंतु गुलाबी लुगडं आणि नथ घालून पद्मश्री स्विकारणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळून राहिल्या. कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९-२० वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपेरे यांना गौरविण्यात आले. आजच्या व्हिडीओमधून जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.