औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात तणाव निर्मण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी अजूनही बंद पाळण्यात येतोय. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुस्लिम समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केल.

हसन मुश्रीफ म्हणाले, “गेला आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिवशी मी निवदेन जाहीर केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच मनामध्ये आकस राहिलेला नाही. गोविंद पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकात लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख मुस्लिम असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील? या मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
drunken security guard assaulted three passengers on Dombivli Nahoor local threatening them
लोकलमध्ये डोंबिवलीतील प्रवाशांना, मद्यधुंद खासगी सुरक्षकाची दमदाटी
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

हेही वाचा >> Video : “वैदिक ब्राह्मण्यवादी वर्ग नेहमीच…” वारकरी लाठीमारप्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “संत परंपरेला संपवण्याचे…”

तसंच, “मुस्लिम धर्मीयांनी आपल्या अल्वयीन मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून हा इतिहास समजून सांगण्याची आवश्यकता आहे”, असंही ते म्हणाले. “फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतात राहिलो आणि भारताच्या मातीमध्ये आपली नाळ घट्ट झाली आहे. भारतीयांचा आणि भारतामध्ये राहणाऱ्या समाजाचा जी भक्ती असेल ती आपली भक्ती असली पाहिजे. त्यामुळे धर्म आपल्याआपल्या घरी करू, शांततेने करू, असं आवाहन मी केलं होतं”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे

टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवले म्हणून पुन्हा वातावरण बिघडले होते. त्या तरुणास अटक केली. अशा घडणाऱ्या घटनांसाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हिंदू-मुस्लिम समाजाने एकमेकांमध्ये सलोखा राहून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

Story img Loader