सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं आठ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची महिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिलीय. नुकतंच पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. नकोशी झालेली चिंधी ते अनाथांची माय असा थक्क करणारा सिंधुताईंचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पाहुयात नक्की कसा होता त्यांचा जीवनप्रवास…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.