Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी विधानसभेच्या आमदारांकडून विधिमंडळात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जातो. सर्वच राजकीय पक्षांनी मतांचे गणित जुळवण्यावर भर दिला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत. जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपलाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मी पहिल्यांदाच भक्कम पाठिंबा घेऊन निवडणुकीला उभा राहिलो आहे. याच्यापूर्वी कमी मतांनी मी निवडून आलो. पण यावेळी शरद पवारांची साथ मला लाभली आहे. महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकून येतील. काँग्रेसचे दोन-तीन आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचाही खळबळजनक दावा जयंत पाटील यांनी केला.

Cabinet Meeting Decision :
Cabinet Meeting Decision : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीस मुदतवाढ, शाळांना २० टक्के वाढीव अनुदान; राज्य सरकारचे मोठे निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
maharashtra assembly elections 2024 sharad pawar ncp names yugendra pawar from baramati seat
‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत
Srigufwara-bijbehara Vidhan Sabha Election Result, Vidhan Sabha Election Result 2024, Assembly Election Result 2024
Srigufwara-bijbehara (Jammu-kashmir) Vidhan Sabha Election Result 2024 LIVE: श्रीगुफवारा-बिजबेहरा विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा.
When will the Nanded Lok Sabha by election be held
नांदेडची पोटनिवडणूक कधी ?
Congress leader met Uddhav Thackeray on his nagpur
नागपूर: काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना भेटले, जागा वाटपावर चर्चा?
chinchwad vidhan sabha marathi news
चिंचवड विधानसभा: अजित पवारांचा आणखी एक खंदा समर्थक साथ सोडणार? बंडखोरी करण्याचा इशारा…म्हणाले, “झुंडशाहीला…”
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

हे ही वाचा >> पडणारा १२ वा उमेदवार कोण? विधान परिषदेसाठी मतांची जुळवाजुळव सुरू

काँग्रेसचे कोणते आमदार फुटणार?

दरम्यान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रसचे कोणते आमदार फुटणार आहेत, याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, आमचे तीन-चार आमदार फुटणार हे आम्हाला माहीत आहे. त्यानुसार आम्ही रणनीती आखली आहे. आमच्या उमेदवार प्रज्ञा सातव या नक्कीच जिंकून येतील. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी आज बैठक होत आहे. आमचे जे उमेदवार फुटणार आहेत, त्यांच्या घरातले कुणी ना कुणी राष्ट्रवादीत गेले आहेत. एक टोपीवाला कधी इकडे असतो कधी तिकडे असतो. एक नांदेडवालाही त्यात आहे.

maharashtra mlc election votes calculation
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत कुणाकडे किती मतं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“आमचे जे चार आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे कान कसे टोचायचे, यासाठी आता बैठक घेणार आहोत. तशी रणनीती आम्ही आखत आहोत”, असेही आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

हे ही वाचा >> विधान परिषद निवडणुकीत मनसेचा एक आमदार सर्वांचं गणित बिघडवणार? राजू पाटील कोणाला मत देणार?

विधानपरिषदेच्या मतांचा कोटा कसा ठरतो?

एकूण मतदान भागीले जेवढ्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागाकार केल्यावर येणाऱ्या संख्येत .१ अधिक केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो. राज्य विधानसभेची सदस्य संख्या २८८ असली तरी आमदारांचे राजीनामे, अपात्रता किंवा निधनामुळे १४ जागा सध्या रिक्त आहेत. परिणामी एकूण मतदार – २७४

२७४ भागीले ११ एक = २२.८३ १ = २२८४ (त्यातही वैध मतांच्या आधारे मतांचा कोटा ठरतो. एखादे मत बाद झाल्यास कोटा कमी होतो)

एका मताचे मूल्य हे १०० असते.

मतांचा कोटा हा शेकड्यात ठरतो. याचाच अर्थ २२८४ म्हणजेच पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल.

कोणत्या पक्षाकडे किती बलाबल?

भाजपकडे अपक्षांसह ११२ मते आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता ११५ मतांची आवश्यकता असून, भाजपने पुरेसे संख्याबळ जमविल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत. एकूण रागरंग बघता शेकापचे जयंत पाटील यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान असेल.