विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा उमेदवारांचा मतांचा कोटा पूर्ण

आतापर्यंत हाती आलेलेल्या निकालानुसार, पंकजा मुंडे यांना २६ मते, योगेश टीळेकर यांना २६ मते, परिणय फुके यांना २६ मते, तर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ २३ मतांची आवश्यकता होती. या २३ मतांचा कोटा भाजपाच्या पाचही उमेदवारांनी पूर्ण केला आहे.

हेही वाचा – Breaking : विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी!

निकालानंतर गिरीश महाजन म्हणाले…

दरम्यान, या निकालानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे जेवढी मतं आहेत, ती मते आम्हाला मिळाली आहे. कोणाकडे किती मते कमी आहे आणि कुणाचे आमदार फुटली, हे थोड्याच वेळात कळेल, या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. पण केवळ ११ उमेदवार निवडून येणार होते. त्यापैकी महायुतीचे संपूर्ण ९ उमेदवार विजयी झाले, असे ते म्हणाले.

विजयानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया…

या निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. या विजयानंतर मला आनंद झाला आहे. यापूर्वी देशपातळीवर काम केलं आहे. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan parishad mlc election bjp pankaja munde and other four bjp mla win spb
Show comments