Vidhan Sabha Election Exit Poll Updates : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात आज २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान झालं असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळे अनेकांची धडधड वाढली आहे.

तसेच राज्यातील जनता नेमकी कोणत्या पक्षाला कौल देते? महाराष्ट्रात कोणता पक्ष मोठा पक्ष ठरणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? राज्यात कोणाची सत्ता येणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता निकालाच्या दिवशीच मिळणार आहेत. मात्र, सध्या एक्झिट पोल समोर आले आहेत. या वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वेगवेगळे अंदाज वर्तवले असले तरी काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.

panvel maha vikas aghadi
पनवेल: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणारे नेते गोंधळात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra fadnavis ajit pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस – अजित पवार आमने सामने! ‘बटेंगे तो कटेंगे’वरून महायुतीत जुंपली? म्हणाले, “राष्ट्रवादी मिजाज…”
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान
Deoli Vidhan Sabha Election Ranjeet Kamble vs Rajesh Bakane
Deoli Vidhan Sabha Constituency : भाजपचा निर्धार, यावेळी तरी देवळीत यशस्वी ठरणार का…

हेही वाचा : जनतेनं कोणत्या शिवसेनेला निवडलं? एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पसंती कुणाला?

सर्वात मोठा पक्ष कोणता ठरणार?

चाणक्य, मॅट्रीक्स, पोल डायरी, पीपल्स पल्स, पोलस्टर एक्झिट पी-एमएआरक्यू यासह अजून काही एक्झिट पोलने वर्तवलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पोल डायरीनुसार भाजपाला ७७ ते १०८ जागा, मॅट्रीक्सनुसार भाजपाला ८९ ते १०१ जागा, चाणक्यनुसार भाजपा ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे समोर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरणार आहे, तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोल्सचे अंदाज काय?

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यचा एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुती १५२ ते १६० : भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२
महाविकास आघाडी १३० ते १३८ : काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?

महायुती १५० ते १७० : भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६

महाविकास आघाडी ११० ते १३० : काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३

पोल डायरीचा अंदाज काय?
महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १८६ आणि महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपाला ७७ ते १०८, शिवसेना (शिंदे) २७ -५०, राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८. तसेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस २८-४७, शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज.

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील युती १७५ ते १९५ जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात १५० ते १७० जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी ११० ते १३० जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.

टाईम्स नाऊ एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १०५ ते १२६, महाविकास आघाडीला ६८ ते ९१ आणि इतर पक्ष आणि अपक्षाला ८ ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

लोकशाही-मराठी रुद्र एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुतीला १२८ ते १४२ आणि महाविकास आघाडीला १२४ ते १४० जागा मिळतील असा अंदाज आहे. तसेच इतर पक्ष आणि अपक्षाला १८ ते २३ जागा मिळतील असा अंदाज आहे.