AIMIM Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल काल (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपा, शिवसेना( शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने१० जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १२५ उमेदवार उभे केले होते, पण पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Rahul Narwekar On Uddhav Thackeray
Rahul Narwekar : उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा झाली? विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही ठरलं का? राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य
Loksatta pahili baju Markadwadi Live Mahavikas Aghadi EVM Scam Assembly Election Results
पहिली बाजू: ‘मारकडवाडी लाइव्ह’ नेमके कशासाठी?
mahayuti government cabine expansion Vidarbha, Ministerships
विदर्भातील सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित, काही जिल्ह्याला तीन तर काहींना एकही नाही, असंतुलित वाटपाने नाराजी
Ajit Pawar :
Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…

दरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळालेल्या या निवडणुकीत अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने मात्र आपले खाते उघडले असून पक्षाला अवघ्या १६२ मतांच्या फरकाने एका जागेवर विजय मिळाला आहे.

असदुद्दीन ओवेसीयांच्या पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण १४ जागांवर उमेदवार दिले होते. ज्यापैकी एका उमेदवाराचा विजय झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल हे अवघ्या १६२ मतांनी विजय झाले आहेत. त्यांना १,०९,६५३ मते पडली. त्यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या आसिफ शेख यांचा पराभव केला, शेख यांना १,०९,४९१ इतकी मते पडली.

निहाल अहमद हे समाजवादी पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यांना अवघी ९,६२४ मते मिळाली. तर एजाज बेग या काँग्रेस उमेदवाराला ७,५२७ मते मिळाली. विशेषबाब म्हणजे मालेगाव मध्य विधानसभेत नऊ उमेदवार असे होते ज्यांना नोटा पेक्षाही कमी मते पडली आहेत. नोटाला या मतदारसंघात १,०८९ इतकी मते पडली.

एआयएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांनी जलील यांचा अवघ्या १,२६१ मतांनी पराभव केला.

येथे अतुल सावे यांना ९३,२७४ इतकी तर जलील यांना ९१,११३ मते मिळली. दुसरीकडे भिवंडी पश्चिम मतदारसंघात AIMIM चे उमेदवार वारीस पठाण हे पाचव्या स्थानावर राहिले. त्यांना फक्त १५,८०० मते मिळाली. भाजपा उमेदवार महेश प्रभाकर चौगुले यांनी भिवंडी पश्चिम मतदारसंघात ७०,१७२ मतांनी विजय मिळवला. एआयएमआयएम पक्षाला या निवडणुकीत ०.८५ टक्के मते मिळाली.

हेही वाचा>> विधानसभेत कोणत्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ सरस; लोकसभेला सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला पक्ष यावेळी तळाला

विधानसभा निवडणुकीत इतर AIMIM उमेदवारांची स्थिती

भायखळा – फयाज अहमद यांचा ५,५३१ मतांनी पराभव

धुळे शहर – फारुख अन्वर पराभूत. त्यांना ७९,७८८ मते मिळाली.

संभाजीनगर मध्य – नसरुद्दीन तकीउद्दीन सिद्दीकी यांचा ७७,३४० मतांनी पराभव

मुंब्रा कळवा – सर्फराज खान पराभूत, त्यांना १३,५१९ मते मिळाली.

वर्सोवा – फक्त २९३७ मते मिळालेल्या रईस लष्करिया यांचा पराभव.

सोलापूर – फारुख मकबूल यांचा ६१,४२८ मतांनी पराभव.

मिरज – महेश कांबळे पराभूत. त्यांना २,५५९ मते मिळाली.

मूर्तिजापूर – सरमत सुरवडे यांना अवघी ३२०१ मते मिळाली.

नांदेड दक्षिण – सय्यद मोईन यांना १५,३९६ मते मिळाली.

कुर्ला – अस्मा शेख या ३,९४५ मतांनी पराभूत झाल्या.

कारंजा – मोहम्मद युसूफ पराभूत झाले. त्यांना ३१,०४२ इतकी मते मिळाली

Story img Loader