मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपान दौरा अर्धवट सोडून महाराष्ट्रात परत आले. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी स्वत: जपान दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रात राजकीय बदल होणार आहेत का? कारण तुम्ही तुमचा परदेश दौराही अर्धवट सोडला आहे, याबाबत विचारलं असता नार्वेकर म्हणाले, “माझा जपान दौरा अर्धवट राहिला नाही. माझा हा दौरा अगदी यशस्वी झाला आहे. जपानला गेल्यानंतर आम्ही तेथील अनेक मुलभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी केली आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचीही पाहणी केली. जपानमधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून मी महाराष्ट्रात आलो.”

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?

हेही वाचा- “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

महाराष्ट्रात काही राजकीय बदल होऊ शकतात का? महाराष्ट्रात बदलाचं वातावरण पाहायला मिळतंय, यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “सध्या राज्यात सगळं व्यवस्थित सुरू आहे. सभागृह आणि शासनही व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे तुम्ही नेमका कोणता बदल म्हणत आहात, त्याची मला कल्पना नाही. शासनाच्या कामाचा वेग चांगला दिसून येत आहे.”

हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…

“विधीमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत. दिवसातील साडेनऊ तास कामकाज झालं आहे. दीडशेहून अधिक लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अशा एकंदरीत राजकीय स्थितीत आणखी सकारात्मक बदल होणार असतील तर त्याचं स्वागतच होईल,” असं सूचक विधान नार्वेकर यांनी केलं.

हेही वाचा- “संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…”, अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका!

वेळेच्या आधी जपान दौऱ्यातून परत येण्याचं नेमकं कारण काय आहे? असं विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले, “मी वेळेच्या आधी जपान दौऱ्याहून परत आलो नाही. अगदी वेळेत आलो आहे. तिथल्या सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून मी इथल्या महत्त्वाच्या बैठका उरकण्यासाठी आलो आहे.”

Story img Loader