सध्या कुंभमेळा ही मोठी पर्वणी आहे. लाखो श्रद्धाळू भावी या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहेत. स्नान करत आहे. मात्र हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा तीर्थयात्रा करतो तेव्हा त्याचे प्रदर्शन किंवा माहिती प्रसारित करू नये असे शास्त्र सांगते. असे असताना आणि एक जण त्या ठिकाणचे पवित्र स्नान केल्याची फोटो व्हिडिओ व यात्रा केल्याची माहिती देत आहे हे अयोग्य आहे अशी टीका करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी शंकराचार्य यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खातगाव येथे समर्थ भक्त अशी राज्यामध्ये ओळख असणारे मोहनबुवा रामदासी यांनी श्री समर्थ रामदास स्वामी मठ बांधला आहे. या मठाला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच दास नवमीचा ३४३ वा उत्सव २२ फेब्रुवारी या दिवशी सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्या पुढाकारातून खातगाव येथे श्री समर्थ रामदास स्वामी मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी येथे राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ शंकराचार्य यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी मठाधिपती मोहन बुवा रामदासी, पुणे येथील इतिहास संशोधक राकेश धावडे पाटील,सरपंच पप्पू शेठ धुमाळ,मुंबई पुणे ठाणे, डोंबिवली कोल्हापूर मिरज पंढरपूर टेंभुर्णी नाशिक यासह विविध जिल्ह्यांमधून भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शंकराचार्य यांचे आगमन होताच त्यांची जोरदार स्वागत उपस्थित भाविकांनी केले याशिवाय साईबाबांच्या मूळ पादुका श्री देशमुख काका निमोण यांच्याकडे आहेत यांचे देखील आगमन या ठिकाणी झाले. याशिवाय संत गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ यांच्या मूळ पादुकांची देखील आगमन या ठिकाणी होणार असून त्यानंतर त्यांची विधीवत पूजा होणार आहे.

शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांचे यावेळी आशीर्वाद पर प्रवचन देखील संपन्न झाले. यामध्ये त्यांनी हिंदू धर्म यास प्रमाणे प्रभू रामचंद्र रामदास स्वामी भक्ती याविषयी उपस्थितांन मार्गदर्शन केले..दास नवमीच्या निमित्ताने मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये पहाटे काकड आरती, यानंतर भगवान श्रीधर स्वामी पादुकांची महापूजा ,दासबोधाचे चक्री पारायण कोटी पजन आणि उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला यानंतर सांप्रदायिक भजन यानंतर मठामध्ये पालखी काढण्यात आला. छबिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तेरा प्रदक्षिणा घेण्यात आल्या . यानंतर हरिभक्त परायण श्री राम बुवा रामदासी मठपती तेरीडोके यांचे रामदासी कीर्तन संपन्न झाले. याचप्रमाणे निलंगा येथील मीनाक्षी पांडे यांचे भक्ती संगीताचा कार्यक्रम सांप्रदायिक उपासना यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक भाविक उपस्थित होते.

पालकमंत्री विखे उपस्थित राहणार

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दास नवमी दिनांक 22 तारखेला याच ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दास नवमी तसेच या मठातील विविध कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसे निमंत्रण राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले असून ती उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मठाधिपती मोहनबुवा रामदासी यांनी दिली.