सोलापूर : राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची सार्वत्रिक उत्सुकता असताना संभाव्य मंत्रिमंडळात सोलापुरातून भाजपला दोन मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात तसा अंदाजही वर्तविला जात आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून सहा जागा लढविलेल्या भाजपाला पाच जागा मिळाल्या असून यात सलग पाचव्यांदा निवडून आलेले सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून ७५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आलेले आणि सलग तिसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे सुभाष देशमुख तसेच अक्कलकोटमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले सचिन कल्याणशेट्टी या तिघांपैकी दोघांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. यापूर्वी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सुभाष देशमुख यांनी सहकार व पणन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले होते. तर विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाबरोबरच परिवहन, वस्त्रोद्योग, उत्पादन शुल्क व अन्य खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र त्याचवेळी या दोन्ही देशमुखांमध्ये उघडपणे उफाळून आलेली गटबाजी, त्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेले शहप्रतिशहाचे राजकारण आजही चर्चेत आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?

हेही वाचा >>> Bachhu Kadu : “…तर मी त्यांना माझ्या पराभवाचं श्रेय दिलं असतं”; रवी अन् नवनीत राणांबाबत बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर मागील अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात या दोन्ही देशमुखांसह सोलापुरातून अन्य कोणालाही संधी मिळाली नव्हती. पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील आदींवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता पुन्हा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा; भाजपा धक्कातंत्र अवलंबणार?

अलीकडे अडीच वर्षांत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले गेले असून फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार कल्याणशेट्टी यांना पालकमंत्र्यानंतर प्रशासकीय पातळीवरील कामे होण्यासाठी विशेष अधिकार बहाल करण्यात आले होते. त्यामुळे कल्याणशेट्टी यांचे महत्त्व वाढले होते. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार का, याकडे अक्कलकोटकरांबरोबर सोलापूरकरांच्याही नजरा वळल्या आहेत. पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांना किमान राज्यमंत्रिपद मिळण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घातले आहे. माळशिरसमध्ये बलाढ्य मोहिते- पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांना कडवी झुंज दिलेले आणि मूळचे संघ परिवाराचे राम सातपुते हे जर निवडून आले असते तर त्यांची मंत्रिमंडळात हमखास वर्णी लागली असती, असे बोलले जाते.

Story img Loader