बारामतीत विजय शिवतारे यांनी बंड पुकारलं आहे. विजय शिवतारेंचं बंड शमणार की नाही? याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. अशात विजय शिवतारेंनी आपण बारामतीत लढण्यावर ठाम आहोत असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचाही आरोप विजय शिवतारेंनी केला. इतकंच नाही तर अजित पवारांची तुलना रावणाशी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले विजय शिवतारे?

“अजित पवार यांनी कायम दादागिरीच केली आहे. राजकारणासाठी ते कुठल्याही पातळीला जाऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की ते नगरविकास मंत्री असताना अजित पवार ८०० कोटींचा निधी घेऊन गेले. त्यावर त्यांना एकनाथ शिंदेही काही बोलले नाहीत. ही मानसिकता आणि प्रवृत्ती संपवण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे.”

रावणाचा वध करण्यासाठी

“मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात आहे. सुनील तटकरे म्हणतात शिवतारेंचे स्क्रिप्ट कोण लिहून देतो ते आम्ही शोध आहोत. मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प बसलात. शरद पवारांनाही हे माहीत आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे.” असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- ‘विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला’, विजय शिवतारेंचा अजित पवारांना टोला

मी खुन्नस म्हणून उभा नाही, पवार पर्व संपवायचं आहे

बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. मी खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभा आहे असं म्हणतात. सुनील तटकरे कुणाची स्क्रिप्ट वाचतोय असं तटकरे म्हणाले. मी आज कार्यकर्त्यांना सांगतो आहे की असा नालायक आणि नीचपणा मी करणार नाही. मी लक्ष्मीनरसिंहपूरच्या देवळातही हेच सांगितलं आहे. झुंडशाही आणि घराणेशाहीच्या लढाईच्या विरोधात मी उतरलो आहे. महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला आहे. सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पर्व सुरु करण्यासाठी मी लढाई लढतो आहे. कुणाला पाडण्यासाठी नाही तर पवार पर्व संपवण्यासाठी मी लढतो आहे. ४० वर्षे आम्ही यांना का मतदान करायचं असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. प्रचंड अत्याचार आणि ग्रामीण दहशतवाद केला आहे. असंही विजय शिवतारेंनी म्हटलं आहे. मी धर्मयुद्ध म्हणून हे स्वीकारलं आहे कुणीही मनात शंका ठेवू नका. असंही विजय शिवतारेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay shivtare on ajit pawar says he shot on farmers determined to kill ravana rno news scj