तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून हटवून विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदलीनंतर आता सरकारवर टीकादेखील होऊ लागली आहे. दरम्यान, यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

विजय वडेट्टीवर यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयीदेखील विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, त्यांची बदली आता अमेरिका किंवा चीनला करा, अशा बोचरी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

हेही वाचा – तुकाराम मुंढे: संघर्षातून जन्मलेला अधिकारी, दोन वेळच्या जेवणाची होती आबाळ

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मला वाटतं की त्यांची बदली आता थेट अमेरिकेतच केली पाहिजे. त्यांची देशात कुठेही बदली केली, तरी त्यांचा त्रास होणारच आहे, अशी राजकीय नेत्यांनी भावना आहे. मग ते आधीचे राजकारणी असोत, किंवा आताचे असो. मात्र, त्यांची एकदाच काय ते अमेरिकेत किंवा रशियात बदली करावी, आवश्यकता वाटल्यात त्यांनी चीममध्येही पाठवावे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

तुकाराम मुंढेंची आतापर्यंत कुठे कुठे बदली झाली?

तुकाराम मुंढे हे २००५ सालचे आयपीएस अधिकारी असून त्यांची गेल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २१ वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००७ सालापर्यंत ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी होते. दरम्यान, गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता, पुन्हा वर्षाच्या आतच दुसरी बदली करण्यात आली आहे.

२००७ – प्रकल्प अधिकारी, धारणी

२००८ – उपजिल्हाधिकारी, नांदेड</p>

२००८ – जिल्हा परिषद सीईओ, नागपूर

२००९ – अति आदिवासी आयुक्त, नाशिक

२०१० केव्हीआयसी मुंबई

२०११ जिल्हाधिकारी, जालना</p>

२०११ १२ – जिल्हाधिकारी, सोलापूर

२०१२ – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई

२०१२ – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई

२०१६ – महापालिका आयुक्त, नवी मुंबई</p>

२०१७ – अध्यक्ष, पीएमपीएएल

२०१८ – महापालिका आयुक्त, नाशिक

२०१८ – सहसचिव, मुंबई नियोजन विभाग

२०१८ – एड्स नियंत्रण मंडळ प्रकल्प संचालक

२०२०- नागपूर महापालिका आयुक्त

२०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

२०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत

२०२२ (सप्टेंबर )- आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

२०२३ – मराठी भाषा विभाग

२०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग

२०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)