ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यावरुन महाविकासआघाडीचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. ‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

“छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत भारतात आणण्याच्या सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण महाराष्ट्राबाहेर उद्योग गेल्याने हजारो युवकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. हा विषय बाजुला ठेवून केवळ भावनेशी खेळून सरकार राजकारण करत असल्याचं राज्यातील युवकांना कळत आहे. त्यामुळे तलवारीबरोबरच राज्यात उद्योगही आणावेत. तेव्हाच सरकारच्या ताकदीवर लोक विश्वास ठेवतील”, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. युवकांची दिशाभूल करण्यासाठी तलवार आणण्याची भाषा करू नये, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न; उदयनराजे म्हणाले, “संपूर्ण जगभरात…”

२०२४ मध्ये शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सांस्कृतीक विभागाकडून कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या सोहळ्यापर्यंत शिवरायांची तलवार राज्यात आणण्याचा सरकारचा मानस आहे.

शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”

शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी एक असलेली ‘जगदंबा’ तलवार करवीरच्या छत्रपती घराण्याकडे होती. ही तलवार सध्या इंग्लडच्या राणीच्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. १८७५-७६ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवे एडवर्ड) भारतभेटीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) राज्य करत होते. यावेळी एडवर्ड यांना ही तलवार भेट म्हणून देण्यात आली होती. ही तलवार पुन्हा भारतात यावी, अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे. कोल्हापूरमधील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने याबाबत मागणीदेखील केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar asked shinde government to bring industries along with jagdamba sword of shivaji maharaj rno news rvs